आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 2, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - अपेक्षित व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. महत्त्वाच्या कामांना वेळ द्यावा लागेल. मानसिकता स्थिर राहून धनलाभाचे योग आहेत. धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून भाग्योदय होऊ शकतो.

वृषभ - मित्रमंडळींच्या गाठीभेटी होऊन काही नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अपेक्षित कार्य करण्यात यश मिळेल.

मिथुन - सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस घ्याल, मन अध्यात्मिक गोष्टीत रमेल. दानधर्म तसेच धार्मिकस्थळी भेट देण्याचा योग आहे.

कर्क - नोकरीत व्यवसाय-धंद्यात कुटुंब परिवारात इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळेल त्यामुळे प्रलंबित कार्ये पूर्ण करू शकाल. संतती सौख्य लाभेल.

सिंह - एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाल सन्मानाचे पद मिळेल आपले निर्णय योग्य करून त्याचे परिणाम सकारात्मक होतील. राहत्या घराविषयीचे समस्या अथवा प्रश्न सुटतील.

कन्या - जमिनीची तसेच थाई संपत्ती विषयी असलेली कामे पुढे ढकला वीत मनात योजलेल्या नियोजनात आयत्या वेळेस महत्त्वाचे बदल घडतील.

तुळ - जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे निर्णय योग्य ठरतील. कामे वाढू शकतात, कार्यरत रहा.

वृश्चिक - नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्या संपर्कात रहाल त्यांना आपल्या मदतीची गरज भासू शकते ती मदत आपण स्वतःहून कराल.

धनु - व्यवसाय धंदा, नोकरीच्या निमित्ताने जवळचे तसेच दूरचे प्रवास घडण्याची शक्यता प्रवास कार्य सिद्ध राहतील. मात्र प्रवासात खाण्यापिण्याची काळजी घ्या.

मकर - मनातील मरगळ निघून जाईल उत्साह वाढवणाऱ्या घटना घडल्यामुळे आपल्या समोरील कामे आपण बेगाने कराल मात्र आर्थिक बाबतीत सावध राहा.

कुंभ - आपले विचार स्पष्टपणे लोकांसमोर मांडला त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल निर्णय खंबीरपणे घ्यावे लागतील. सकारात्मक विचारांच्या व्यक्तींची संबंध येईल.

मीन - आपल्या वर्तणुकीतून किंवा बोलण्यातून इतरांचा अपमान होत नाही याची काळजी घ्या कोणालाही दुखवू नका इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या मग आपले मत व्यक्त करा.

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात कुरमुऱ्यांचा चिवडा हवाच! 'या' सोप्या पद्धतीने बनवा, अनेक दिवस टिकेल कुरकुरीतपणा

Diwali Sweet Recipe : केशराचा सुगंध अन् खव्याची चव; दिवाळीसाठी बनवा खास मलाई पेढे

महिनाभराचा किराणा आणताना पैशांची बचत कशी कराल? गृहिणींसाठी खास टिप्स!

Diwali Padwa 2026 : यंदाच्या पाडव्याला पत्नीला द्या हटके गिफ्ट; 'या' आयडिया एकदा पाहाच

आई श्रीदेवीची आठवण करून देणारा जान्हवी कपूरचा 'नागिन' अवतार! हॅलोविन पार्टीतील फोटो पाहून चाहते थक्क