मेष - कुटुंबातील सर्व सदस्यांशी सामंजस्याने वाघा काही नवीन गोष्टी समजतील त्यामुळे पुढे आपल्या नियोजनातही बदल करावा लागेल मुलांकडून काही चांगल्या वार्ता कानी येतील.
वृषभ - हातातील कामांना विशेष गती येईल दीर्घकालीन रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होऊन कामे होतील. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.
मिथुन - कुटुंबात काही समस्या निर्माण झालेल्या दिसतील त्या समस्या घरातील सदस्यांबरोबर तसेच ज्येष्ठ व्यक्तींबरोबर चर्चा करून यशस्वीरित्या सोडवता येतील.
कर्क - आपले कर्तुत्व झळाळून निघेल. अवघड वाटणारे काम पूर्ण झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. आपला इतरांवर प्रभाव पडेल. आपले म्हणणे इतरांना पटवण्यात यश मिळेल.
सिंह - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मत विचारात अवश्य घ्या. त्याने तुमचा फायदाच होईल व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून उलाढाल वाढेल.
कन्या - लहान मोठ्या कारणांवरुन महत्त्वाचे प्रवास घडतील प्रवास कार्य सिद्ध साध्य होतील नोकरीतील किंवा घरातील अधिकाराचा योग्य वापर करा. दिवस आनंदात जाईल.
तुळ - आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. निरनिराळ्या ठिकाणाहून धन आगमनाचे योग. खुश राहाल तसेच घरातील सदस्यांना खूश ठेवाल. त्यांच्यासाठी काही खरेदी होईल.
वृश्चिक - आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासात आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक चांगल्या विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहणे हिताचे ठरेल.
धनु - काही गोष्टी मनासारख्या घडल्यामुळे स्वप्नांमध्ये रमुन जाल कोणत्या दृष्टिकोनातून अवश्य प्रयत्न करणे म्हणजे यश मिळेल सरकारी काम होतील.
मकर - जुने मित्र - मैत्रिणी भेटतील जुन्या आठवणींना उजाळा वेळ मौजमजा करण्यात जाईल छोट्या अंतराचे प्रवासही होऊ शकतात सामाजिक कार्यात तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ - स्वतःसाठी तसेच घरच्यांच्या साठी काही खरेदी करावी लागेल खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. घरातील समस्या स्वतःच्या पुढाकाराने यशस्वीरित्या सोडवाल.
मीन - स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा घरी तसेच आपल्या कार्यक्षेत्र वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल. आत्मनिरीक्षण करा. मनोरंजनाने मनावरचा ताण जाईल.