आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २७ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 27, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - गृहसौख्य चांगले राहील घरासाठी वेळ द्यावा कामांचा आढावा घ्याल पुढील कामाचे नियोजन कराल भावंडांची जवळच्या नातेवाईकांची भेट होईल.

वृषभ - प्रगतीच्या दृष्टीने मनासारखी कामे होतील, मनासारख्या घटना घडतील जीवनसाथीची साथ राहील मात्र थोडा वाद विवाद संभवतो भावंडांशी सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन - नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील. प्रगती होईल नवीन अधिकार मिळतील व्यवसायामध्ये योग्य निर्णय घेतले जातील हे निर्णय फायद्याचे ठरतील आर्थिक आवक चांगली राहील.

कर्क - आर्थिक स्थिती चांगली राहील अर्थ मान चांगले राहील जुनी येणी वसूल करताना आपल्या बोलण्यावर आणि वागण्या वरती नियंत्रण हवे खर्चाचे प्रमाण वाढू शकते.

सिंह - अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटतील. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. काही सकारात्मक घटना घडतील.मान-सन्मानाचे योग. प्रवास कार्यसिद्ध होतील.शुभवार्ता कानी येतील.

कन्या - मालमत्तेचे प्रश्न सुटतील. विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. नोकरी मधील वातावरण बदलेल कुटुंबातील मुलांच्या यशाबद्दल वार्ता कळतील समाधानी राहाल.

तुळ - महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्याल नशीब साथ देईल नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल मनावर थोडा ताण राहील काळजी वाटेल गृहसौख्य मिळेल.

वृश्चिक - आर्थिक प्राप्ती चांगली राहील मात्र अनावश्यक खर्चाला कात्री लावली तर बरे होईल अनेक कामे मार्गी लागतील एखाद्या कामांमध्ये मात्र विलंब लागू शकतो.

धनु - आपल्या जोडीदाराचे अथवा भागीदाराचे म्हणणे ऐका. शक्यतो प्रवास टाळा कागदपत्रे जपून ठेवा आरोग्यावर लक्ष असू द्या. रागावर नियंत्रण आवश्यक.

मकर - कुटुंबातील मुलांच्या यशा विषयीच्या वार्ता आपल्याला सुखावून जातील मुलांशी चर्चा करा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा वस्तुस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्या.

कुंभ - आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करावयास मिळाल्यामुळे आनंद वाटेल कलाकार खेळाडू यांना बरेच दिवसांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते

मीन - भावंडांच्या गाठीभेटी होतील काही गैरसमज होण्याची शक्यता आहे घरात पाहुण्यांचे आगमन होईल नोकरीत वादापासून दूर रहा बदलीची शक्यता आहे.

BMC Election : भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागा लढवणार?

मुलांच्या इंटरनेट वापराच्या निर्बंधासाठी कायदा करा! मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाचे केंद्राला निर्देश

प्रचारसभांत राज-उद्धव यांचे परस्परविरोधी व्हिडीओ? भाजपची मुंबई निवडणुकीसाठी रणनीती

Mumbai : मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉकच प्रवाशांना टॅक्सी, रिक्षाचा आधार

अगरबत्तीसाठी नवे BIS मानक; ८ हजार कोटींच्या बाजाराला चालना मिळणार