मेष - महत्त्वाच्या कामासाठी जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात प्रवास कार्य सिद्ध होतील मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. कुटुंबात शुभवार्ता मिळतील.
मिथुन - व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील व्यवसायात आर्थिक मदत मिळू शकते कर्ज मंजूर होऊ शकते कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.
कर्क - आरोग्य उत्तम राहील यामुळे आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण कराल मानसिक स्वास्थ्य लाभेल जिद्द आणि चिकाटी मध्ये वाढ होईल.
सिंह - कोणत्याही कामामध्ये घाई गर्दी ने निर्णय घेऊ नका निर्णय चुकीचे होऊ शकतात पर्यायाने नुकसान संभवते शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकला.
कन्या - जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंद होईल तसेच काही नवीन परिचय होऊ शकतात त्यामुळे वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता दिवस आनंदात जाईल.
तुळ - नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होऊ शकते. केलेल्या कामाचे चीज होईल.
वृश्चिक - एखादी महत्वाची बातमी समजल्यामुळे कामाच्या स्वरूपात बदल करावा लागेल. धावपळीची शक्यता.स्थाई मालमत्तेसंबंधी कार्य पुढे ढकलावे.
धनु - काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील खर्चाचे प्रमाण आता अचानक वाढ झाल्यामुळे चिंतित राहू शकता धावपळ होईल.
मकर - कुटुंबातील मुला-मुलींच्या कडून त्यांच्या प्रगतीच्या संबंधी वार्ता कानी आल्यामुळे आनंदित राहाल. कुटुंब साठी खरेदी कराल.
कुंभ - नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते केलेल्या कामाचे बक्षीस मिळेल भाग्याची साथ मिळून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आर्थिक आवक चांगली राहील.
मीन - जीवनसाथी बरोबर असलेले मतभेद संपुष्टात येऊन नात्यात मधुरता निर्माण होईल तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल आर्थिक बाजू ठीक राहील.