मेष : आपल्या कार्यक्षेत्र अथवा परिवारात वाद-विवाद टाळणे जरुरी आपल्या सहवासातील नकारात्मक मंडळींशी संवाद नको अलिप्त राहा. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात यश मिळवाल.
वृषभ : कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान अथवा कार्यक्रम घडेल आप्तेष्ट नातेवाईक तसेच मित्रमंडळींचा सहवास लाभेल. घरात उत्सवाचे वातावरण असेल. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : आकारण मनात असलेली एखादी गुप्त चिंता सोडा. लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा नुकसानीची शक्यता. परिवारातील वाद-विवाद सांभाळा. नोकरीत अनुकूलता राहील.
कर्क : वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रवास घडतील प्रवासात अतिआत्मविश्वास आणि स्पर्धा करणे अंगाशी येईल. कुटुंब परिवारातील मुलांना सांभाळा.
सिंह : सामाजिक मानसन्मान मिळतील बुद्धिजीवी मंडळींना अतिशय उत्तम दिवस. एखादे मानाचे स्थान मिळेल मात्र कुटुंब परिवारात-कार्यक्षेत्रात समज गैरसमज तसेच वाद विवाद टाळवे.
कन्या : सामाजिक तसेच इतर कार्यक्रमांमध्ये अथवा सार्वजनिक गोष्टीतून उपद्रव पोहोचू शकतो. मुर्खांच्या नंदनवनात रमू नका तसेच कुसंगती टाळा व्यवसाय-धंद्यात कामगार पीडा होण्याची शक्यता.
तुळ : कोणत्याही स्वरूपाच्या नोकरीत आपल्या कामाला महत्त्व देणे हितकारक ठरेल. लहान मोठ्या प्रलोभनांपासून कटाक्षाने दूर राहा शिस्त आणि नियम पाळा कामांमध्ये काटेकोर राहणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून व्यावसायिक जुनी येणी येतील व्यवसायात प्रगती व उन्नती होण्याची शक्यता. भागीदारी व्यवसायात प्रगती करू शकाल.
धनु : कुटुंब परिवारात तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात व आपल्या कार्यक्षेत्रात लहान मोठ्या कारणांवरून वाद-विवाद होऊन कलह सदृश्य प्रसंग सामोरे येऊ शकतात. आपण शांत राहणे गरजेचे ठरेल.
मकर : लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधान व सतर्क राहणे गरजेचे ठरेल तरुणांना आपल्या कार्यक्षेत्रात तसेच शिक्षण कला छंद व वैयक्तिक उपक्रमातून यश मिळू शकते प्रसिद्धी मिळेल.
कुंभ : कुटुंबातील लहान-मोठ्या समस्या आपल्या पुढाकाराने सोडवू शकाल. नोकरीमध्ये प्रगती कारक घटना घडेल परदेशगमनाची शक्यता व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहील.
मीन : इतरांशी संवाद साधताना वादग्रस्त मुद्दे जरूर टाळा. कुटुंब परिवारात व आपल्या कार्यक्षेत्रात इतरांच्या मताला प्राधान्य द्या कोणाचाही अपमान करणे महागात पडू शकते.