आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३१ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 31, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष: लाभदायक दिवस राहील नोकरीत विशिष्ट बदलातून लाभहोतील व्यवसाय धंद्यात प्रगती करू शकाल. पूर्वी केलेले नियोजन - यशस्वी होऊन सिद्धीस जातील. आर्थिक आवक चांगली राहील.

वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब परिवारात सर्व सदस्यांचे सहकार्य मिळत राहील महत्वाचे प्रश्न हातावेगळे करू शकाल नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीची निश्चिती होईल.

मिथुन : भाग्याची साथ मिळेल व्यवसाय धंद्यात नवीन उपक्रम सुरू करता येतील स्वतंत्र व्यवसायिकांना मोठे लाभ नवीन करार होऊ | शकतात नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.

कर्क: अध्यात्मिक प्रचिती येईल धार्मिक विषयां कडे कल असेल. कलाकारांना मानसन्मान मिळेल प्रसिद्धी मिळेल. राहत्या घराचे प्रश्न सुटतील. नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील.

सिंह: प्रगती उन्नती होईल समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी होतील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल एखाद्या समारंभाचे निमंत्रण येईल त्या समारंभात एखादे मानाचे स्थान मिळेल.

कन्या : कुटुंबातील सदस्यासाठी खरेदी करू शकाल. राहत्या घरात भौतिक सुविधा वाढविण्यासाठी खर्च कराल मनोरंजनासाठी वेळ व पैसा दोन्ही खर्च करू शकता अचानक धनलाभाचे योग.

तुळ : समाजातील गुरुतुल्य तसेच सन्माननीय व्यक्तींचा सहवास लाभेल त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन लाभू शकते व्यवसाय धंद्यामध्ये उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढलेले अनुभवण्यास मिळेल.

वृश्चिक: सहकुटुंब सहपरिवार एखाद्या पर्यटन स्थळी जाण्याचे निश्चित कराल. कुटुंब परिवारातून मदत मिळेल नोकरी मधील परिस्थिती सर्वसामान्य राहील. व्यवसाय धंद्यात उलाढाल वाढेल.

धनु : पूर्वी केलेले नियोजन सफल होताना दिसेल. नवीन तंत्रज्ञान वापराल व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल कुटुंब परिवारातील वातावरण प्रसन्न राहील. मुला मुलींकडून शुभवार्ता मिळतील.

मकर: नोकरी व्यवसाय तसेच कुटुंब परिवारात संबंधित व्यक्तींबरोबर वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. व्यवसाय धंद्यात सरकारी कामे करावी लागतील त्यासाठी वेळ द्यावा लागेल.

कुंभ: व्यवसाय धंद्यात काही फायद्याचे सौदे हाती येतील. तसेच लहान-मोठे प्रवास करण्याची तयारी ठेवा. व्यवसाय कार्य सिद्ध होतील व्यवसायिक प्रतिष्ठा वाढेल.

मीन: खर्चाचे प्रमाण वाढेल प्रवास शक्यतो टाळावेत जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायनवीन उपक्रम सुरु कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

Sunday Special Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मसालेदार फिश टिक्का; चव लागेल भन्नाट

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी खा मनुका घातलेले दही; आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला उपाय

Weight Loss Diet : वजन कमी करण्याचा स्वादिष्ट फंडा; आहारात समाविष्ट करा 'हे' ६ हेल्दी पदार्थ

किचनमधील काळेकुट्ट स्विच बोर्ड होतील नव्यासारखे; फॉलो करा या ८ सोप्या टिप्स

आजही तितकीच सुंदर! गुलाबी-पिवळ्या साडीत माधुरी दीक्षितचा एलिगंट अंदाज