मेष - कामाचा ताण जाणू शकतो, धावपळ करावी लागेल तसेच खर्चातही वाढ होऊ शकते परंतु हा खर्च चांगल्या कामासाठी होत असल्यामुळे त्याचे काही वाटणार नाही.
वृषभ - आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. मित्रमंडळींच्या सहवासात दिवस आनंदात व्यतीत कराल महत्त्वाच्या कामात यश प्राप्त होईल. धनलाभाचे प्रमाण वाढते राहील.
मिथुन - समाजातील आपली पत प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सुख लाभेल. पत्नीचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील महत्वाचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवू शकाल.
कर्क - हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात परंतु आपण त्यावर यशस्वीरीत्या मात कराल. व्यवसायामध्ये स्पर्धकांवर मात कराल. मान सन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह - पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा होईल नवीन गुंतवणुकीचा विचार असेल परंतु त्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडेल.
कन्या - कामामध्ये चिकाटी व जिद्द तसेच आत्मविश्वास ठेवण्याची आवश्यकता. चर्चेने प्रश्न सुटू शकतात विनाकारण ताण तणावाखाली राहू नका.
तुळ - मनोरंजनाकडे कल राहील. मित्रमंडळींच्या समवेत मजेत वेळ जाईल. मात्र कुसंगत टाळून व्यसनांपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल.
वृश्चिक - जमिनी बद्दलची अथवा स्थावर मालमत्ते विषयी ची कामे पुढे ढकलण्या चा प्रयत्न करावा. कुटुंबात अचानक काही महत्त्वाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
धनु - महत्त्वाच्या कामांमध्ये आयत्या वेळेस काही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे सरकारी कामात विलंब लागू शकतो ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील.
मकर - हातातील कामात सुयश लाभेल. स्थावर मालमत्ता विषयी नवीन प्रस्ताव येथील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील कौटुंबिक सुख मिळेल.
कुंभ - शुभ कार्यामुळे मित्रमंडळी आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. अचानक धन्या लाभाची शक्यता. नोकरी मध्ये गैरसमज होण्याची शक्यता.
मीन - नोकरीत तसेच व्यवसायात समाधान कारक परिस्थिती राहिल्यामुळे समाधानी राहाल कुटुंब परिवारात उत्साह व आनंद राहील.