मेष - काहींच्या घरात मंगलकार्य ठरेल तरुण-तरुणींचे विवाह ठरतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक महत्वाकांक्षा पूर्ण होतील यश मिळेल कुटुंब परिवार सुवार्ता मिळतील.
वृषभ -आपल्या कला छंद इत्यादी उपक्रमातून यश मिळेल आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील काहींना परदेशगमनाचे योग सहकुटुंब सहपरिवार प्रवासाच्या योजना करू शकाल.
मिथुन - तरुण-तरुणींचे नोकरी मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होतील पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती सफल होऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शक. धनलाभाचे योग.
कर्क - स्वतंत्र व्यवसायिकांना आज चढत्या क्रमाने यश मिळेल उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढलेले दिसेल कर्जफेड करू शकाल मात्र दुर्घटनेपासून सावध रहा.
सिंह - दैनंदिन कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील महत्वकांक्षी कामे होतील मानसन्मानाचे योग मिळतील एखाद्या समारंभाच्या ठिकाणी मानाचे पद मिळेल परदेशगमनाच्या संधी कलाकारांचे भाग्योदय.
कन्या - संमिश्र स्वरुपाचा दिवस जाईल मात्र धनलाभाचे योग आहेत.जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील वाहने सावकाश चालवा.
तुळ - तरुण-तरुणींना नवीन नवीन संधी मिळतील आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे खुश असाल संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
वृश्चिक - कुटुंब परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या हाता पायाच्या दुखापतीचा पहा व्यवसायिक तेजी राहील.
धनु - रोजची कामे व्यवस्थित होतील वैयक्तिक कला छंद व उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल नोकरी मधील परिस्थिती अनुकूल राहील प्रेमात यश मिळेल कोर्ट प्रकरणे पुढे ढकला.
मकर - कुटुंब परिवारात आनंद देणार्या घटना घडतील नोकरीमध्ये सुवार्ता मिळतील बढती अथवा वेतन वृद्धि मिळू शकते. परंतु हितशत्रूंच्या कारवाया मुळे मनस्ताप होण्याची शक्यता.
कुंभ - महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील होतकरू तरुणांचे प्रश्न सुटतील काहींना यश आणि प्रसिद्धीचे योग आहेत सरकारी स्वरूपाची कामे आज करून घ्या.
मीन - व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील व्यवसायात काही नवीन बदल करू शकाल आर्थिक गरज असल्यास ती पूर्ण होईल बँकांची कामे होतील आर्थिक मदत मिळेल.