आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंब परिवारातील मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभ - व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल काही नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील नवीन करारमदार होण्याची शक्यता.

मिथुन - आपल्या रोजच्या जीवनातील दैनंदिन कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण कराल. जमिनी विषयक किंवा स्थावर मालमत्तेच्या विषयक असलेले व्यवहार गतिशील होतील.

कर्क - आजचा दिवस अनुकूल जाईल महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांची शक्यता असल्यामुळे वादग्रस्त बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करू नका.

सिंह - कर्जाची आवश्यकता भासल्यास अथवा आर्थिक मदतीची गरज भासल्यास कर्जे मंजूर होऊ शकतात थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

कन्या - आपल्या आजूबाजूला एखादी महत्त्वाची घटना घडल्यामुळे तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे पण हा बदल सकारात्मक ठरवू शकतो.

तुळ - स्वतःचे काम स्वतः करा कोणाच्याही वरती जबाबदारी देऊ नका अथवा इतरांचे सहकार्य अपेक्षित ठेवू नका. कोणालाही गृहीत धरू नका. आर्थिक व्यवहारात सतर्क राहण्याची आवश्यकता.

वृश्चिक - मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय धंद्यातील उधारी उसनवारी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल आपली देणी आपण सुकती करू शकाल. नवीन योजना अमलात आणू शकाल.

धनु - आपल्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता प्रवासामध्ये आपल्या वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा हरवण्याची किंवा गहाळ होण्याची दाट शक्यता.

मकर - अनपेक्षित धनलाभ झाल्यामुळे मनसोक्त खर्च करावा परंतु आपण चुकीच्या गोष्टींसाठी अथवा व्यक्तींसाठी खर्च करत नाही ना याचा विचार आवश्यक ठरेल.

कुंभ - कामाची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ व दगदग होईल. कामावर ती लक्ष केंद्रित करा गोंधळून जाऊ नका इतरांचे सहकार्यावर अवलंबून राहू नका.

मीन - अपेक्षित पत्रव्यवहार पूर्ण होतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊ शकाल आपले म्हणणे थोडक्यात पण स्पष्टपणे इतरां समोर सादर करणे महत्त्वाचे ठरेल.

आमच्या संधी मारल्या ही मतलबी ओरड कशासाठी?

Mother’s Day 2026 : 'ही' स्मार्ट उपकरणं तुमच्या आईसाठी ठरतील बेस्ट; घरकाम होईल सोपं, पाहा Photos

लहानपणीची आठवण ताजी करणारी चिंचेची कँडी; सोपी आणि झटपट रेसिपी

ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये साराचा बोल्ड अंदाज; अंजली तेंडुलकरांनीही वेधलं लक्ष, पाहा Photos

World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय