राशीभविष्य

२३ एप्रिलचे राशीभविष्य

Swapnil S

मेष - कुटुंबकडून सुवार्ता मिळतील. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. सहकुटुंब प्रवासाचे योग संभवतात. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

वृषभ - व्यवसायात काही नवीन बदल होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबातील मुलींकडून सुखद बातम्या मिळतील. काही महत्त्वाच्या कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता.

मिथुन - कामाचे स्वरूप बदलल्यामुळे जास्त कष्ट घ्यावे लागतील. कुटुंबातील मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. जोडीदाराची साथ लाभेल. कामकाजात प्रगती होईल. सुवार्ता समजेल.

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात उलाढाल वाढेल. जुने मित्र भेटतील. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. शक्यताे प्रवास टाळा.

सिंह - वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याची शक्यता. आज आपल्याला विविध मार्गाने धनप्राप्ती होऊ शकते. खर्चाचे प्रमाणही वाढते. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कन्या - वाहन सांभाळून चालवा. वेगावर मर्यादा ठेवा. कुटुंबात जोडीदाराशी सूर जुळेल. नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घेणे आवश्यक आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

तुळ - जाेडीदाराबरोबर नात्यात गोडवा राहील. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ आहे. एखाद्या व्यवहारांमध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता. सहकाऱ्यांची साथ मिळेल. विविध प्रकारचे फायदे संभवतात.

वृश्चिक - मनावर कसला तरी ताण असणार आहे. चिंता वाटत राहील. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीमध्ये परिस्थिती सर्वसामान्य राहील. कुटुंबामध्ये वादविवाद टाळणे हितकारक ठरेल.

धनु - आर्थिक भरभराट होण्याची शक्यता. अनावश्यक खर्चाला कात्री लावा. आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. आपली मते इतरांवर लादू नका.

मकर - कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात समज-गैरसमज होऊ शकतात. थोडी अस्वस्थता जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.

कुंभ - आपल्या क्षमतेला डोळ्यासमोर ठेवून नवीन कामे स्वीकारा. कुटुंबात गैरसमज उद‌्भवतील. मात्र वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये प्रगतीची शक्यता.

मीन - आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. नोकरीमध्ये अनपेक्षित घटना घडतील. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांना यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस