मेष - आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी येतील. त्या चांगल्या प्रकारे आपण अमलात आणाल. आपल्या स्वतःच्या धाडसाने आणि बुद्धिमत्तेने आपला व्यापार व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ - आपणाला ताणतणावातून आणि अडचणीतून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून आपल्याला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.
मिथुन - आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. काही धाडसी निर्णय घ्याल. त्यामध्ये चांगले यश येणार आहे. प्रेमासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जोडीदाराचा आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.
कर्क - काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहात. मित्रमंडळी सोबत आणि कुटुंबीयांचशी चांगले संबंध असणार आहेत. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.
सिंह - आज आपण आपल्या कामाकडे पूर्णपणे लक्ष देणार आहात. हा वेळ आणि देव तुमच्या बाजूने आहे. तुमच्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे. नातेवाईकांना मदत करावी लागणार आहे.
कन्या - आपल्या व्यापार व्यवसायामध्ये प्रगती होऊन चांगला मोबदला मिळणार आहे .आर्थिक प्रगतीचे होणार आहे. एखादी उधारी वसूल होऊ शकते . नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.
तुळ - आज आपले मनोबल चांगले असणार आहे. दूरचे प्रवास होऊ शकतात पण प्रवास टाळलेले बरे. काढून त्यातून फायदा होणार नाही. आजचा दिवस आपणास मिश्र घटनांचा असणार आहे.
वृश्चिक - आजचा दिवस फार समाधानकारक जाणार नाही. अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. जे प्रयत्न कराल त्याच्यामध्ये हवे तसे यश मिळेल याची शक्यता कमी आहे. काम जास्त करावे लागणार आहे.
धनु - आजचा दिवस आपणास विविध प्रकारे अनुकूल जाणार आहे. आजूबाजूचे वातावरण खूप चांगले असणार आहे. समस्या आल्या तरी त्या सहज सोडवाल. प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदत मिळेल.
मकर - आपल्याला आपल्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. आपल्यासाठी आजचा दिवस आनंदी जाणार आहे. व्यवसाय मध्ये चांगली प्रगती होईल. नोकरीमध्ये अनुकूलता राहणार आहे.
कुंभ - आपण नोकरी करत असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात उत्साही आणि आनंदाने होणार आहे. आर्थिक वाढीची शक्यता आहे. नवीन उपक्रम सुरू करण्याची शक्यता आहे. काही धार्मिक कार्य होऊ शकते.
मीन - नवीन गुंतवणुकीचा विचार असेल तर आज तो धोका पत्करू नका. नवीन अडचणी समोर येतील.नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कुरबुरी होण्याची शक्यता आहे.जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतात.