मेष - वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली जुनी येणी वसूल होतील. आजूबाजूला अनुकूलता भरून राहिल्याने उत्साह आणि उमेद वाढेल.
वृषभ - महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या मित्रमंडळींची तसेच समाजातील मान्यवरांची मदत आणि मार्गदर्शन मिळेल.
मिथुन - काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्यासारखे वाटू शकतात पण जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे हे कार्यमग्न रहा. स्वतःची कामे स्वतः करा. अर्थप्राप्ती होईल.
कर्क - नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकार्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे लाभेल. काही महत्त्वाचे बदल घडू शकतात ते बदल आपल्याला फायदेशीर ठरतील.
सिंह - समाजातील सन्माननीय व मान्यवरांच्या ओळखी होतील लोक संग्रहामध्ये वाढ होईल. एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषविता येईल.
कन्या - आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात प्रकृतीकडे लक्ष द्या. शत्रु हितशत्रूंच्या कारवाया मध्ये वाढ होऊ शकते. परंतु त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या कार्यात मग्न रहा.
तुळ - नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहून वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. एखादी विशेष महत्त्वाची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. लहान मोठे प्रवास सुद्धा करावे लागतील.
वृश्चिक - खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल अनावश्यक खर्च नको. व्यापार-व्यवसायात अचानक काही खर्चिक बाबी पुढे येतील. सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल.
धनु - वर्तमानात असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य सुधारेल. शासकीय स्वरूपाची कामे पूर्ण होतील. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील.
मकर - स्थायी संपत्ती अथवा जमीन-जुमला याबद्दलची कार्ये गतिशील होतील. वडिलोपार्जित संपत्ती विषयक असलेले वाद मिटू शकतात. सरकारी कामे होतील मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ - दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण झाल्याने ती कार्य पूर्ण करण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत रहाल. कौटुंबिक सुख मिळेल.
मीन - व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन गुंतवणूक करण्याआधी त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा विचार विमर्श घेणे महत्त्वाचे ठरेल.