मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे सुरळीत होण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता भासेल ओळखी मध्ये तीन चा उपयोग होईल.
वृषभ : अपेक्षित पत्रव्यवहार सफल होतील. समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी होऊन महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. आरोग्य चांगले राहून उत्साही व आनंदित रहाल.
मिथुन : मनोबल उत्तम राहून आपल्या बोलण्याची छाप इतरांवर पाडण्यात यश मिळेल महत्त्वाची कामे होतील दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक येणी वसूल होतील.
कर्क : नोकरीमध्ये व्यवसाय धंद्यात नवीन सुसंधी लागतील त्याचा फायदा करून घ्या व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संकल्पनांचा वापर सफल होईल.
सिंह : आपल्या आजूबाजूला गतिशील घटना घडतील. दीर्घकाळ रखडलेली महत्त्वाची कामे गतिमान होतील विशेषतः स्थावर मालमत्ते विषयी ची कामे पूर्ण करू शकाल.
कन्या : कुटुंबांमधील काही प्रश्न चर्चेने व समन्वयाने सोडवाल जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल तुमच्या शब्दाला कुटुंबामध्ये मान राहील. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या मताला प्राधान्य मिळेल.
तुळ : आपल्या कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ करण्याची गरज भासेल परंतु धावपळीमध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंकडे नीट लक्ष द्या. अध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : कुटुंबामध्ये चांगले वातावरण राहून कुटुंबातील मुला मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा बातम्या कानावर आल्यामुळे आनंद वाटेल संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
धनु : राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांनी आपल्या वर्तणूक आणि बोलणे आवडते नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे विरोधक प्रबळ होतील.
मकर : कुटुंब परिवारात एखादे मंगल कार्य ठरू शकते नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ : व्यवसाय धंदा नोकरीतील रखडलेली कामे पूर्ण करू शकाल कामगारांचे सहकार्य लाभेल मात्र सरकारी कायदे व नियम पाळण्याची आवश्यकता. समारंभाची निमंत्रणे मिळतील.
मीन : रोजच्या जीवनात तुमचे मनोबल वाढवणारी एखादी घटना घडल्यामुळे आश्चर्य वाटेल दिनक्रम बदलू शकतो. उत्साह व आनंद वाटेल. कौटुंबिक सुख लाभेल.