आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 28, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - एखादी महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल आनंद द्विगुणित होईल उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

वृषभ - एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. व्यवसाय धंद्यात तसेच नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल.

मिथुन - व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल आरोग्य उत्तम राहील. जुने मित्रमंडळी भेटतील. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते.

कर्क - अनेकांशी सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल.

सिंह - आपली दैनंदिन कामे अडथळ्याविना पूर्ण होत असलेली बघून आश्चर्य वाटेल.धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांची निमंत्रणे मिळू शकतात एखादे महत्त्वाचे स्थान अथवा पद मिळू शकते.

कन्या - नोकरीमध्ये आपल्याला पल्या सहकार्‍यांचे सहकार्य लाभल्यामुळे आपले काम सुकर होईल इतरांचे मार्गदर्शन लाभेल. मात्र आपल्या कामांमध्ये चालढकल करू नका.

तुळ - मनोबल उत्तम राहून आरोग्यही चांगले राहील व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक - कार्यक्षेत्र वाढून कार्य व्याप्तीही वाढेल मात्र आपल्या अधिकार कक्षेत काम करून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. सरकारी नोकरी मध्ये अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो.

धनु -सरकारी कामात विलंब लागू शकतो तसेच कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात लहान मोठ्या कारणांवरून वाद-विवाद घडण्याची शक्यता असल्यामुळे कलह सदृश्य प्रसंग टाळणे.

मकर - जोडीदाराशी मधुर संबंध राहतील उत्साह आणि उमेद वाढेल आपल्या समोरील महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण करू शकाल व्यवसाय धंद्यात नवीन भागीदारी विषयी विचारणा होऊ शकते.

कुंभ - काही वेळेस अचानक खर्च करावा लागू शकतो खर्चाचे प्रमाण वाढेल तसेच आपल्या कार्यक्षेत्रात विरोधक, हितशत्रू इत्यादींचा त्रास संभवतो.

मीन - काही बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबातील मुला-मुलीं कडून शुभवार्ता मिळतील.

मुंबईत परतीच्या पावसावर चक्रीवादळाचं सावट! पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगाच्या अटींना केंद्र सरकारची मंजूरी

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला

माज उतरला, माही खान वठणीवर आला! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच "मुंबई मेरी जान...जय महाराष्ट्र" म्हणत मागितली माफी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?