डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
सिंह रास
मानसन्मानाचे योग
मघा नक्षत्राचे चार चरण पूर्व नक्षत्राचे चार चरण उत्तरा नक्षत्राचा पहिला चरण मिळून सिंह राशी तयार होते. सिंह म्हणजे औदार्य, अधिकार, लालसा, सत्तेचा लोभ, कर्तृत्व, स्वावलंबी, राजेपणा असे गुण निसर्गतः असतात.
शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी चांगला आहे. आपल्या कष्टाला तसेच घेतलेल्या परिश्रमाला शुभ ग्रहांची साथ मिळणार आहे. त्यामुळे आपण घरगुती यश प्राप्त करू शकाल, मग ते क्षेत्र कुठलेही असो आपल्या क्षेत्रात आपण उंचीवर जाल. प्रयत्न करा. शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. कलाकारांना व क्रीडा क्षेत्रातील जातकांना अनुकूलता लाभेल. तसेच ज्यांना प्रदेशातून संधी हवी आहे त्यांना त्यात यश मिळणार आहे. त्यासाठी नियोजन करायला हरकत नाही. या कालावधीत शिक्षणासाठी अनुकूलता पुरेपूर लाभेल.
पारिवारिक :- बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित घटना घडून काही वेळेस त्रास होऊ शकतो. कुटुंब परिवारामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. त्याप्रमाणे वादविवाद घडण्याची पण शक्यता आहे. परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींना मानाचे स्थान देणे गरजेचे राहील. त्याचप्रमाणे फसवणुकीचे पण योग आहेत. त्यामुळे कोणतीही खरेदी करताना अथवा कोणताही लहान मोठा आर्थिक व्यवहार करताना तो पडताळून बघणे तसेच आपल्या क्षमतेचा पण विचार करणे गरजेचे ठरेल. या कालावधीच्या सुरुवातीला मानसन्मानाचे योग आहेत. सामाजिक मानसन्मान मिळू शकतो. परिवारातील तरुण तरुणींचा परदेशी भाग्योदय होण्याची शक्यता राहील. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. तसेच त्यांची मदतही मिळू शकेल. आपण कुटुंबाकडे जास्त लक्ष देणार आहात. त्याचप्रमाणे अडचणींवरती यशस्वीपणे मात करू शकाल.
नोकरी-धंदा-व्यवसाय : - सदरच्या कालावधीमध्ये चांगल्या घटनांचा ओघ चालू राहील. वादग्रस्त येणे येतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. त्यातल्या त्यात नोकरी विषयक प्रयत्न सफल होतील. नोकरी विषयक दिलेला मुलाखती सफल होतील. मित्र व सहकारी यांच्याकडून सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे लाभही होईल. व्यापार व्यवसायातून काही करार होऊ शकतात. तरुण-तरुणींना स्पर्धात्मक यश मिळेल. सुवर्ता मिळतील. गुरुबळ चांगले आहे. त्यामुळे पूर्वसंचित फळाला येईल. व्यापार व्यवसायिकांनी सर्व प्रकारचे खबरदारी घेणे आवश्यक आहे. भागीदारी व्यवसायामध्ये भागीदाराशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. विकासाच्या संधी मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. आपणास अडथळे अडचणी यातून मार्ग काढावा लागेल. तुम्ही आपल्या धाडसाने व योग्य निर्णय आणि मार्ग काढणार आहात. विपरीत परिस्थितीत विचारपूर्वक कार्य करणार आहात. कोणत्याही प्रकारचा मोठा धोका स्वीकारू नये. अंदाजावर निर्णय घेऊ नयेत. वस्तुस्थिती पडताळून पाहणे गरजेचे ठरेल. कामाचा जास्त ताण असला तरी तो ताण कमी करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. आवश्यक कामे समोर येतील. कामाच्या नियोजनामुळे योग्य कमी केली जातील. इतर व्यक्तींकडून मदत घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेचा वापर करून कार्य पूर्ण करा. सर्व कामात व्यवहारी विचार जास्त करा. भावनात्मक निर्णय घेऊ नये. नवीन नवीन करार किंवा कंत्राटी मिळतील घरातले व्यक्तींची योग्य काळजी घ्याल. नवीन उद्योगातून आपणास निराळे लाभ मिळतील. तुमचे व्यवहार फायदेशीर ठरणार आहेत. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामाचे नियोजन केल्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल. व त्यात त्रासही होणार नाही. वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या खाजगी आयुष्यात सौख्य येणार आहे. तुम्ही वाहन किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकाल. कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी योग्य कालावधी आहे. हा कालावधी आपणासाठी अनुकूल ठरणार आहे. स्वतःच्या विचारात बाबत आपणास पूर्ण आत्मविश्वास असणार आहे. अचानक प्रवास संभवतो. तुमचे व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहजपणे पार पडणार आहेत. तुमच्या स्पर्धकांच्या पुढे एक पाऊल असणार आहे. एकापेक्षा अनेक स्त्रोतातून आपले उत्पन्न वाढेल. तुमचे सहकार्य आणि इतर संबंधित यांच्याशी असलेले आपले संबंध उत्तम राहतील. जास्तीचे उत्पन्न मिळवून देणारा हा कालावधी ठरेल. वेळ व काळ तुमच्या बाजूने असणार आहे. तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला अपेक्षित असलेले मिळेल.
शुभ दिनांक : - ४, ७, १२, १५, १८, १९, २१, २५, २७
अशुभ दिनांक : - ६, ८, ११, १७, २२, २३, २४, २६
कन्या रास
गतिमान व प्रवाही कालावधी
उत्तरा नक्षत्राचा दुसरा चरण तिसरा चरण चौथा चरण त्याचप्रमाणे हस्त नक्षत्राचे चार चरण व चित्रा नक्षत्राचा पहिला चरण मिळून नऊ जणांचा मिळून कन्या रास होते. व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा व्यवहार, कुशलता, मोहक सौंदर्य रेखीव व प्रमाणशीर अवयव रचना चौकसपणा धान्य संग्रहाची आवड, कार्यनिपुण, बंधुप्रेम, सात्विक वातप्रकृती इत्यादी वैशिष्ट्ये आढळतात.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल कालावधी आहे. ग्रहण क्षमता चांगली असल्याने कमी वेळात जास्त अभ्यास चांगला होऊ शकतो. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. प्रदेशातून संधी मिळवण्यासाठी मात्र जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. पण प्रयत्नाने व सातत्याने यश निश्चितच मिळेल.
पारिवारिक : - सदरचा कालावधी मोठा गतिमान व प्रवाही राहणार आहे. तरुण-तरुणींचे परदेशात भाग्योदय होतील. पौर्णिमेजवळ वैयक्तिक उत्सव समारंभ साजरे करू शकाल. या कालावधीच्या उत्तरार्धात आपल्या कार्यक्षेत्रात तसेच आपल्या कुटुंब परिवारात गैरसमज होऊ देऊ नका. तसेच अमावस्या जवळचा कालावधी गुप्त चिंता दर्शवतो. घरातील वातावरण चांगले असणार आहे. एकमेकांना सहयोग करणारे वाचन असेल. कुटुंबात आनंदाचे क्षण असतील. आर्थिक बाबतीत घरात सर्वांच्या गरजा पूर्ण होतील. तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण कराल. कुटुंबात आनंदाचे क्षण साजरी करण्यासाठी काही कार्यक्रम होतील. चविष्ट जेवणाचा स्वाद घ्याल. नातेवाईक आप्तेष्ट यांची भेट होईल.
नोकरी-व्यवसाय-धंदा : - शुभ ग्रहांची साथ संगत मिळणार आहे. व्यापार व्यवसायासाठी अनुकूल कालावधी आहे. त्याचप्रमाणे वास्तूची खरेदी होऊ शकते. समाजातून वेगवेगळ्या प्रकारचे मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. भागीदारीतून लाभ होतील. कायदेशीर प्रकरणे सर्व कार्य नियम अटींच्या माध्यमातून पूर्ण करणे, अन्यथा त्रास होऊ शकतो. व्यापार व्यवसायात दीर्घकाळ रखडलेली येणे वसूल होतील. ओळखीतून तसेच मध्यस्थीतून लाभ होतील. गैरसमज टाळणे महत्त्वाचे राहील. काही वेळा गुप्त चिंता निर्माण होऊ शकते. काही अनपेक्षित घटना समोर येतील. शत्रुत्वाच्या झळा जाणवतील. बाकी शुभ ग्रहांची साथ मिळणारच आहे. थोडा मोठ्यांचे सहकार्य मिळणार आहे. सरकारी कामात यश मिळणार आहे. प्रवासात सांभाळून असावे आपणास कर्ज हवे असल्यास ते मंजूर होईल. आर्थिक मदत मिळू शकते. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काळजी घेणे जरुरी आहे. या काळात केलेल्या भागीदारी फायदेशीर ठरणार आहेत. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमचे संबंध नातेवाईक व इतर जणांशी चांगले राहतील. संवाद व वाटाघाटी तुमच्या बाजूने असणार आहेत. नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापार व्यवसायात आपण नवीन संकल्पनांचा वापर यशस्वीपणे करू शकाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अथवा व्यक्तिगत कामाच्या कारणांनी प्रवास होतील. नवीन व्यवसायात उत्तम लाभ मिळतील. नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील व प्रवाशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभणार आहे. आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. अध्यात्मिक तसेच धार्मिक कार्याकडे तुमचा कल असेल. एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्याचे योग आहेत. तसेच आपल्या हातून दान धर्म होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी समोर येईल. तुमचे वागणे प्रभावशाली असणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीचा फायदा आपणास होईल. इतर जणांशी नेतृत्वाचे संबंध प्रस्थापित कराल. ज्यांना ओळखत नाही अशा व्यक्ती सुद्धा आपल्याशी आत्मीयतेने वागतील. आपली इच्छापूर्ती होण्याचा कालावधी आहे. एखाद्या व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. कामाच्या तसेच नोकरीच्या ठिकाणी वातावरण आपणासाठी चांगले असणार आहे. कामात आर्थिक वाढ किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेची खरेदी होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रातील बदल हे आपल्या पथ्यावरच पडणार आहेत. वरिष्ठ व अधिकारी वर्ग यांची कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे. तुमच्या व्यक्तिगत व व्यावसायिक सामाजिक आयुष्य सकारात्मक बदल होताना दिसतील. त्यामुळे आपण समाधानी राहाल. तुम्ही निश्चित यशस्वी होणार आहात. आर्थिक लाभासाठी हा काळ अनुकूल आहे.
शुभ दिनांक : - ३, ७, १२, १४, १५, १६, २१, २७,२९, ३०,३१
अशुभ दिनांक : - ६, ८, ११, १७, २२, २३, २४, २६