नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य 
राशीभविष्य

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन

महत्त्वाची कामे पूर्ण होतील

मिथुन रास ही बुधाची रास आहे त्यामुळे या राशीवर बुध या ग्रहाचे कारकत्व अथवा वर्चस्व असते मिथुन राशि मध्ये मृगशीर्ष अद्रा व पुनर्वसू ह्या नक्षत्रांचा समावेश होतो. मृगशीर्ष नक्षत्राची देवता चंद्रा असल्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ओम चंद्राय नमः हा जप करावा आदरा नक्षत्राच्या व्यक्तींनी ओम नमः शिवाय अथवा शंकराचा कोणताही जप करावा कारण या नक्षत्राची देवता शिव आहे कोणत्याही महत्त्व असलेल्या कामासाठी सुरुवात करताना मुघशीर्ष नक्षत्राच्या व्यक्तींनी हा जप केल्यास त्यांचे काम होते त्यांना त्या कामात यश मिळते पुनर्वसू नक्षत्राची देवता अदिती आहे त्यामुळे त्यांनी ओम आदित्य नमः हा जप करावा त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होऊन जीवन चांगले जाईल

शिक्षण : मिथुन राशीच्या जातकांना सदरचा कालावधी शिक्षण घेण्यासाठी चांगला राहील कारण त्यांना गृहमंत्री अनुकूल आहे कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा चांगले अनुभव येतील यश मिळेल आपले कर्तुत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील प्रसिद्धी मिळू शकते त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील शिक्षणासाठी सुद्धा अनुकूलता लाभेल परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी सहजतेने व चांगले वातावरण लाभून यश मिळू शकते योग्य प्रयत्न व अभ्यासातील सातत्य यशासाठी कारणीभूत ठरू शकते स्पर्धा परीक्षेत सुद्धा चांगले यश मिळवू शकाल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत रहा. प्रयत्नांना यश निश्चितच मिळेल.

पारिवारिक : अनुकूल ग्रहमान असल्यामुळे मिथुन राशीच्या जातकांसाठी हा कालावधी आनंददायक व उत्साही राहील महत्त्वाची कामे झाल्यामुळे आनंद द्विगुणीत होईल घरातील सदस्यांसाठी मनसोक्त खर्च करू शकाल कारण उत्पन्न चांगले राहील मोठे अनुकूल बद्दल घडू शकतात तसेच कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून सर्वच बाबींमध्ये आपल्याला वाढते सहकार्य मिळेल मानवी सहकार्यातून मोठे लाभ मिळतील कुटुंब परिवारामध्ये कार्याची धावपळ वाढेल आप्तेष्ट नातेवाईक यांचे सुद्धा सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे वैयक्तिक छंद व उपक्रमातून विक्रमी यश मिळू शकते नवपरिणीतांना अपत्य लाभ होईल अचानक धन लाभाची शक्यता व्यवसाय धंद्यात मोठे करार होऊ शकतात.

नोकरी, व्यवसाय व धंदा : मागील काही काळातआपण घेतलेल्या परिश्रमाचे उत्कृष्ट फळ सध्याच्या काळात मिळू शकते आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये नोकरी व्यवसाय धंद्यामध्ये अनुकूल घटना घटित होऊन जीवनमान सुधारेल रोजचे जीवनमान बदलू शकते सध्याच्या कालावधीमध्ये अनुकूल ग्रह मनाची साथ मिळाल्याने आपली बहुतेक कार्य चांगल्या तऱ्हेने पार पडतील आपले प्रयत्न यशस्वी होते व्यवसाय धंद्यामध्ये आपल्याला कामगारांचे तसेच भागीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल त्यामुळे व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक राहील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी झालेली अनुभवता येईल तसेच असलेली कर्जे आपण चुकती करू शकाल जुनी दीर्घकाळ रखडलेली सरकारी कामे आता वेगळी करता येतील.

नोकरीमध्ये आत्तापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळेल आपल्याला नोकरीमध्ये स्वारस्य निर्माण होईल उत्साहाने हातातील काम संपवून नवीन कामे हाती घ्याल नोकरीत अपेक्षित घटना गठित होऊन पदोन्नती अथवा वेतन वृद्धी सारख्या घटना घडतील कुटुंब परिवारातील विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना अपेक्षित यश मिळेल खेळाडू व कलाकारांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील विवाह योग्य तरुण तरुणांचे विवाह जमतील आप्तेष्ट नातेवाईक तसेच मित्रमंडळाचे सहकार्य लाभेल नवपरिणीतांना अपत्य लाभाचा योग आहे आपल्या छंद अथवा उपक्रमातून विक्रमी यश संपादित करता येईल चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो त्याप्रमाणे प्रसिद्धी सुद्धा लाभेल एखाद्या विशिष्ट परिस्थितीचा फायदा होऊन आपले रोजचे जीवनमान उच्चस्तरीय होईल.

शुभ दिनांक : 1,2,3,10,14,21,26,29

अशुभ दिनांक : 5,7,9,13,20,22,24,27,30

कर्क

आडाखे-अंदाज यशस्वी ठरतील

कर्क रास ही चंद्राची रास आहे त्यामुळे चंद्र या ग्रहाचे वर्चस्व अथवा कारकत्व कर्क राशीवर असतेकर्क राशि मध्ये पुनर्वसू पुश्य व आश्लेषा ही तीन नक्षत्रे येतात पुनर्वसू नक्षत्राची देवता आदिती आहे हे नक्षत्र असलेल्या जातकांनी आदित्य नमः या मंत्राचा जप करावा तसेच पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती आहे अशा जातकांनी ओम बृहस्पतये नमः हा जप केल्यास त्यांची सर्व कामे व्यवस्थित होऊन कष्टाचे प्रमाण कमी होते आश्लेषा नक्षत्राची देवता धनु व सर्प आहे त्यांनी ओम धेनु देवताय नमः असा जप करावा अथवा ओम सरपाय नमः यापैकी कोणत्याही जप केल्यास त्यांचे यशाचे प्रमाण वाढते मात्र जप नियमितपणे करायला हवा

शिक्षण : कर्क राशीच्या जातीकांना शिक्षणातील कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेता येईल अनुकूल कालावधी आहे स्थिरता मिळू शकते अभ्यासच सातत्य व योग्य प्रयत्न केल्यास उत्तम यश मिळू शकते कला व क्रीडा क्षेत्रातही अपेक्षित यश साध्य करता येईल अभ्यासासाठी अनुकूल वातावरण राहील चांगले निकाल हाती येतील परदेशासंबंधी शिक्षणासाठीही अनुकूल कालावधी आहे योग्य प्रयत्न केल्यास त्यात चांगले यश प्राप्त होईल.

पारिवारिक : कर्क राशीच्या जातकांना ग्रहमान अनुकूल असल्याकारणाने त्यांच्या यशाच्या प्रमाणात वाढ होऊन प्रगतीचा आलेख चढता राहील आपल्या बुद्धी कौशल्याने व व्यावहारिक चातुर्याने महत्त्वाची कामे आपण पूर्ण करू शकाल बुद्धी कौशल्यातून मोठा फलदायी होणारा कालावधी आहे आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक बाबतीमध्ये आपले अंदाज व आडाखे बरोबर येतील त्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच राजकीय क्षेत्रातून निरनिराळे लाभ मिळू शकतात शत्रूंवर विजय मिळवता येईल या कालावधीच्या उत्तरार्धात मात्र कुटुंब परिवारातील सदस्यांच्या बरोबर वादविवादाची शक्यता असल्याकारणाने वादविवाद टाळणे हितकारक ठरेल व कुटुंबातील शांतता टिकून राहील तसेच वाहन चालवताना दक्ष राहावे वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे विचित्र दुखापती होण्याचा संभव आहे.

नोकरी, व्यवसाय व धंदा : हा कालावधी व्यवसाय धंद्यासाठी पोषक ठरणार आहे व्यावसायिक उलाढाल वाढल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल चालू व्यवसायामध्ये नवीन संकल्पनांचा वापर करून व्यवसाय एका नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यास यश प्राप्त होईल नवीन भागीदारीच्या व्यवसायाबाबत विचारणा होऊ शकते. व्यवसायातील जुनी येणे वसूल होतील त्याचप्रमाणे व्यावसायिक विस्ताराचा विचार करू शकाल. रोजच्या जीवनातही आपल्याला सकारात्मकता व्यापलेली अनुभवास येईल जीवनच काही गोष्टी आपण करावयाच्या होत्या त्या केल्या गेल्याने आपल्याला वेगळाच आनंद मिळणार आहे. कृतकृत्याची भावना मनात भरून येईल. नशीब आपल्याबरोबर आहे याची जाणीव होईल परमेश्वराचे आभार माना काही अविस्मरणीय घटना घडवून आपल्याला कायमचा आठवणीत राहतील त्यामुळे हा कालावधी संस्मरणीय राहील.

नोकरीतील वातावरण आपल्याला अनुकूल असेल त्यामुळे कामात मन लागेल आपण आपल्या कामात अधिक दक्ष राहाल इतरांची व वरिष्ठांशी विनयशीलतेने वागाल. कुटुंब परिवारामध्ये एखादे मंगल कार्य ठरेल विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील विद्यार्थ्यांनी त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल अपेक्षित यश मिळवून स्पर्धात्मक यश मिळेल. आपल्या कामाचा दर्जा वाढेल व्यापार व्यवसायात उत्तम लाभ होतील आर्थिक उत्पन्न वाढल्याने आपण चांगली गुंतवणूक करू शकाल पूर्वीच्या गुंतवणूक आर्थिक फायदा मिळवून देतील.

शुभ दिनांक : 1,2,3,10,14,21,25,29

अशुभ दिनांक : 5,7,9,13,20,22,24,27,30

आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात कुरमुऱ्यांचा चिवडा हवाच! 'या' सोप्या पद्धतीने बनवा, अनेक दिवस टिकेल कुरकुरीतपणा

Diwali Sweet Recipe : केशराचा सुगंध अन् खव्याची चव; दिवाळीसाठी बनवा खास मलाई पेढे

महिनाभराचा किराणा आणताना पैशांची बचत कशी कराल? गृहिणींसाठी खास टिप्स!

Diwali Padwa 2026 : यंदाच्या पाडव्याला पत्नीला द्या हटके गिफ्ट; 'या' आयडिया एकदा पाहाच