अक्षररंग

धडा

आमचा दामू तसा, नाकासमोर चाले, दुसऱ्याच्या बोलण्यात, तोंड मात्र घाले...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

आमचा दामू तसा

नाकासमोर चाले

दुसऱ्याच्या बोलण्यात

तोंड मात्र घाले

एकदा तो फिरत फिरत

न्यायालयात आला

चाललेला खटला

त्याने पाहिला

आरोपीला वकील येथे

फाडफाड बोले

साक्षी पुरावे तर

किती वेळ चाले

निकाल काही लागेना

दामू झाला बेजार

कडकडून भूकही

लागली त्याला फार

तेवढ्यात जज बोले

ऑर्डर ऑर्डर

दामू म्हणे मिसळपाव

येऊ द्या हो लवकर

धावतच पोलिस आता

दामूकडे गेले

दामूलाच पिंजऱ्यात

उभे त्यांनी केले

तोंड मध्ये घालण्याचा

मिळाला हो धडा

दामू म्हणे चूक झाली

साहेब मला सोडा

साहित्य अकादमी, बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार