बिझनेस

भारतातील 5G ​​ग्राहक संख्या २०३०पर्यंत तिप्पट होणार

भारतातील 5G ​​ग्राहकांची संख्या २०३० पर्यंत तिपटीने वाढून ९७० दशलक्ष होईल, जे प्रमाण एकूण मोबाईल ग्राहकांच्या ७४ टक्के आहे, असे एरिक्सन कंपनीच्या अहवालात मंगळवारी म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील 5G ​​ग्राहकांची संख्या २०३० पर्यंत तिपटीने वाढून ९७० दशलक्ष होईल, जे प्रमाण एकूण मोबाईल ग्राहकांच्या ७४ टक्के आहे, असे एरिक्सन कंपनीच्या अहवालात मंगळवारी म्हटले आहे.

एरिक्सन कंझ्युमरलॅब संशोधन अहवालानुसार, एकाच वेळी जनरेटिव्ह एआय ॲप्लिकेशन्स 5G कार्यक्षमता वाढीसाठी आणि संख्यावाढीसाठी प्रमुख प्रेरक घटक असल्याचे दिसून येते.

एरिक्सन मोबिलिटी अहवालाचा अंदाज आहे की, २०२४ च्या अखेरीस भारतातील 5G ​​ग्राहक संख्या २७० दशलक्षांपेक्षा जास्त होतील, जे देशातील एकूण मोबाईल ग्राहक संख्येपैकी २३ टक्के आहे.

5G ग्राहक संख्या २०३० च्या अखेरीस सुमारे ९७० दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जे मोबाईल ग्राहक संख्येच्या ७४ टक्के आहे, असे उमंग जिंदाल, नेटवर्क सोल्युशन्स, सॉफ्टवेअर आणि परफॉर्मन्स, दक्षिणपूर्व आशिया, ओशनिया आणि भारत, एरिक्सन म्हणाले.

अहवालानुसार, २०२४ च्या अखेरीस जागतिक 5G ग्राहक संख्या जवळपास २.३ अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी सर्व जागतिक मोबाईल सदस्यतांच्या २५ टक्के आणि २०३० पर्यंत ६.३ अब्ज इतकी असेल. तर २०२७ मध्ये 5G ग्राहक संख्या 4G ग्राहक संख्येच्या जागतिक ग्राहक संख्येला मागे टाकतील अशी अपेक्षा आहे. २०३० मध्ये प्रथमच 6G सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, असे जिंदाल म्हणाले.

एरिक्सन कंझ्युमरलॅबच्या अहवालानुसार जनरेटिव्ह एआय ॲप्स वापरणाऱ्या स्मार्टफोन धारकांची संख्या पुढील पाच वर्षांत वाढण्याची शक्यता आहे. भारतातील 5G ​​स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी सुमारे ६७ टक्के पुढील पाच वर्षांत जनरेटिव्ह एआय ॲप्सचा सप्ताहात वापर करतील, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, भारतातील स्मार्टफोन वापरकर्ते व्हिडीओ कॉलिंग, स्ट्रीमिंग आणि ऑनलाईन पेमेंटसाठी खात्रीशीर कामगिरीसाठी अतिरिक्त पैसे देण्यास तयार आहेत. सहा पैकी एक 5G वापरकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी खात्रीशीर कनेक्टिव्हिटीसाठी त्यांच्या वर्तमान मासिक मोबाईल खर्चाच्या २० टक्के भरण्यास तयार आहेत, असे एरिक्सनच्या कन्झ्युमरलॅबचे प्रमुख जसमीत सेठी म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक