बजाज पल्सर NS400Z बजाज ऑटो
बिझनेस

वेगवान अन् स्टायलिश! Bajaj Pulsar NS400Z लॉन्च, जाणून घ्या किंमत

Bajaj Pulsar NS400Z वेगवान आणि शक्तिशाली इंजिनसह लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Suraj Sakunde

गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून बजाज पल्सरनं भारतातील स्पोर्ट बाईक विश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. भारतीय ग्राहकांची गरज ओळखून कंपनीनं पल्सरची विविध मॉडेल्स बाजारात आणली. भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या बजाज ऑटोनं आता बजाज पल्सरचं नवं मॉडेल Pulsar NS400Z लॉन्च केलं आहे. ही बाईक पूर्वीपेक्षा वेगवान आणि अधिक शक्तिशाली इंजिननं सुसज्ज आहे. याशिवाय काही नवीन फीचर्सचाही यात समावेश करण्यात आला आहे.

Bajaj Pulsar NS400Z डिझाइन:

बजाज पल्सर NS400Zच्या डिझाइनबाबत बोलायचं झाल्यास ही बाईक पल्सर NS200चा नवीन अवतार असल्याचं दिसतं. पण तिची रचना थोडी शार्प करण्यात आली आहे. निळ्या-काळ्या आणि लाल रंगांव्यतिरिक्त ही बाइक दोन नवीन रंगांमध्ये देखील उपलब्ध आहे. पल्सर NS400मध्ये स्पोर्टी ग्राफिक्स आणि वायब्रंट कलर पॅलेट आहे.

बाईकचा ट्रिपल-टोन फिनिश आणि हेडलाइट्स खूपच आकर्षक दिसतात. डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आणि एलईडी प्रोजेक्टर लाइट्समुळं बाईक सर्वांचं लक्ष खेचून घेते. बाईकच्या बाजूला तुम्हाला एक मोठी इंधन टाकी दिसेल, तिचं डिझाइनही उत्तमरित्या केलेलं आहे.

अधिक शक्तिशाली इंजिन:

Bajaj Pulsar NS400Z मध्ये डॉमिनरप्रमाणे 373cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8,800 rpm वर 39.4bhp पॉवर आणि 6,500rpm वर 35Nm टॉर्क जनरेट करेल. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स आणि विशेष क्लचसह जोडलेले आहे, ज्यामुळं सहजतेनं गीअर बदलता येतील.

Bajaj Pulsar NS400Z वैशिष्ट्ये:

Pulsar NS 400Z मध्ये दुहेरी सीट (स्प्लिट सीट), रुंद हँडलबार आणि स्पोर्टी राइडिंग स्थितीसाठी मागील बाजूस फूटपेग आहेत. NS200 च्या तुलनेत व्हीलबेस किंचित वाढवण्यात आला आहे.

नवीन 373cc लिक्विड-कूल्ड इंजिन हाताळण्यासाठी फ्रेम मजबूत करण्यात आली आहे. या बाईकच्या मागील आणि पुढच्या दोन्ही बाजूस 17 इंच अलॉय व्हील आहेत. बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एबीएस आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील समाविष्ट आहे.

किती असेल किंमत:

बजाज पल्सर NS400Z भारतात 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक नावाप्रमाणेच पल्सरची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली पल्सर आहे, आणि यामुळेच ती इतर पल्सर रेंजपेक्षा वेगळी ठरते.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नसल्याचा लगेच निष्कर्ष काढू नका! AAIB अहवालावर एअर इंडियाच्या ‘सीईओं’चे विधान