नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन १२.६ टक्क्यांनी वाढून एप्रिलमध्ये सुमारे २.३७ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे, असे सरकारी आकडेवारीवरून गुरुवारी दिसून आले.
एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये झाले होते. १ जुलै २०१७ रोजी अप्रत्यक्ष कर व्यवस्था लागू झाल्यानंतरचा हे दुसरे सर्वाधिक संकलन आहे.
मार्च २०२५ मध्ये १.९६ लाख कोटी रुपये झाले होते. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा जीएसटी महसूल १०.७ टक्क्यांनी वाढून सुमारे १.९ लाख कोटी रुपये झाला, तर आयात केलेल्या वस्तूंमधून मिळणारा महसूल २०.८ टक्क्यांनी वाढून ४६,९१३ कोटी रुपये झाला. एप्रिलमध्ये परतफेड जारी करण्याचे काम ४८.३ टक्क्यांनी वाढून २७,३४१ कोटी रुपये झाले. परतफेड समायोजित केल्यानंतर, एप्रिलमध्ये निव्वळ जीएसटी संकलन ९.१ टक्क्यांनी वाढून २.०९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.