नवी दिल्ली : १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात केली होती. हे लाभ केवळ नवीन करप्रणाली घेणाऱ्या करदात्यांना मिळणार आहेत.
नोकरदारांना ७५ हजार रुपयांची अतिरिक्त वजावटही मिळणार आहे. त्यामुळे १२ लाख ७५ हजार उत्पन्नापर्यंत नोकरदारांना प्राप्तिकरावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. तसेच नवीन कर व्यवस्थेत कर श्रेणीत बदलही केले आहेत. करदात्याने कोणतीही कर प्रणाली न निवडल्यास त्याला आपोआप नवीन कर प्रणालीत ग्राह्य धरले जाईल. ज्या करदात्यांना ‘८० सी’चे लाभ घ्यायचे असतील, त्यांना जुनी करप्रणाली स्वीकारावी लागणार आहे.