बिझनेस

चीनला मागे टाकत भारताची आगेकूच; MSCI EM मार्केट इंडेक्समध्ये मारली बाजी!

सप्टेंबर २०२४ मध्ये एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स (MSCI EM IMI) मध्ये भारताने चीनला मागे टाकल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने घोषित केले आहे.

Swapnil S

मुंबई : सप्टेंबर २०२४ मध्ये एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स (MSCI EM IMI) मध्ये भारताने चीनला मागे टाकल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने घोषित केले आहे. एमएससीआय ईएम आयएमआय मध्ये भारताचा हिस्सा २२.२७ टक्के इतका असून, त्या तुलनेत चीनचा हिस्सा केवळ २१.५८ टक्के आहे.

एमएससीआय आयएमआयमध्ये ३,३५५ स्टॉक्स (समभाग) असून त्यात मोठ्या, मध्यम आणि लघु भांडवली कंपन्यांचा समावेश आहे. त्यामध्ये २४ उदयोन्मुख बाजारपेठांच्या देशांमधील समभागांचा समावेश असून, ते प्रत्येक देशातील तरल समायोजित बाजार भांडवलाच्या अंदाजे ८५ टक्के वाटा उचलते.

प्रमुख एमएससीआय ईएम निर्देशांक (मानक निर्देशांक) मध्ये मोठ्या आणि मध्यम भांडवली कंपन्यांचा समावेश आहे तर आयएमआयमध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु भांडवली समभागांची व्यापक श्रेणी समाविष्ट आहे. एमएससीआय आयएमआयमध्ये चीनच्या तुलनेत भारताचा वाटा अधिक असल्यामुळे त्याच्या खात्यातील लघु-भांडवली समभागांचे प्रमाण अधिक आहे.

रिबॅलन्सिंग, अर्थात समतोलता साधल्यामुळे बाजारपेठेत हा व्यापक कल दिसून येतो. चीनमधील आर्थिक संकटामुळे चिनी बाजारपेठा अडचणीत आल्या आहेत, तर भारताच्या बाजारपेठेला अनुकूल मॅक्रोइकॉनॉमिक (सूक्ष्म-आर्थिक) परिस्थितीचा लाभ मिळत आहे. अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या भक्कम मॅक्रोइकॉनॉमिक पायामुळे तसेच भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राच्या भरीव कामगिरीमुळे भारताने शेअर बाजारात चांगली कामगिरी केली आहे. त्याशिवाय भारतीय शेअर बाजारातील तेजी लार्ज कॅप (मोठे भांडवल असलेल्या) तसेच मिड कॅप (मध्यम भांडवल) आणि स्मॉल कॅप (लघु भांडवल) कंपन्यांच्या निर्देशांकांमध्ये दिसून आली आहे. २०२४ च्या सुरुवातीच्या काळात थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) ४७ टक्के वाढ, ब्रेंट क्रूड (कच्चे तेल) दर कमी होणे आणि भारतीय रोखे बाजारात परकीय गुंतवणुकीत (एफपीआय) मोठी वाढ, हे प्रमुख घटक या सकारात्मक घडामोडींसाठी कारणीभूत आहेत.

परिणामी, एमएससीआय आपल्या निर्देशांकांमध्ये भारतीय समभागांचा सापेक्ष भार वाढवत आहे. एमएससीआय ईएम आयएमआय व्यतिरिक्त, एमएससीआय ईएम निर्देशांकात चीनच्या वेटेज (भार) मध्ये तुलनेने घट होण्याबरोबरच भारताच्या वेटेजमध्ये झालेली वाढ यावरूनही हे स्पष्ट होते. २४ मार्च ते २४ऑगस्ट या कालावधीत एमएससीआय ईएममध्ये भारताचाा वेटेज (भार) १८ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर गेले आहे, तर याच कालावधीत चीनचे वेटेज २५.१ टक्क्यांवरून २४.५ टक्क्यांवर घसरले आहे.

एमएससीआय ईएम आयएमआयमधील या फेरबदलानंतर भारतीय शेअर बाजारात सुमारे ४ ते ४.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक होऊ शकते, असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी निर्धारित गुंतवणुकीचा वेग कायम ठेवण्यासाठी भारतामध्ये देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही स्त्रोतांमधून भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय