बिझनेस

पहिल्या तिमाहीत GDP वधारून ७.८% ; पाच तिमाहीतील उच्चांक; राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर

अमेरिकेने आयात शुल्क लादण्यापूर्वीच्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीत ७.८ टक्के इतकी वाढ झाली. या तिमाहीतील जीडीपी वाढ पाच तिमाहींमधील सर्वाधिक आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: अमेरिकेने आयात शुल्क लादण्यापूर्वीच्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीत ७.८ टक्के इतकी वाढ झाली. या तिमाहीतील जीडीपी वाढ पाच तिमाहींमधील सर्वाधिक आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ प्रामुख्याने कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे झाली. भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली आहे, कारण एप्रिल-जून कालावधीत चीनची जीडीपी वाढ ५.२ टक्के होती. माहितीनुसार, जानेवारी-मार्च २०२४ मध्ये याआधीचा सर्वाधिक जीडीपी वाढ ८.४ टक्के होती.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कृषी क्षेत्राने ३.७ टक्के वाढ नोंदवली, जी २०२४-२५ च्या एप्रिल-जून कालावधीत १.५ टक्के होती.

तथापि, आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ किरकोळ वाढून ७.७टक्क्यांवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ७.६ टक्के होती.

या महिन्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँकेने २०२५-२६ साठी वास्तविक जीडीपी वाढ ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता, ज्यामध्ये पहिल्या तिमाहीत ६.५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.७ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती