एक्स @CMOMaharashtra
बिझनेस

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये उद्योगांची रीघ; रिलायन्स इंडस्ट्रीजची ३ लाख ५ हजार कोटींची तर टाटा समूहाची ३०,००० कोटींची गुंतवणूक

दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये दुसऱ्या दिवशी अनेक कंपन्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले.

Swapnil S

मुंबई : दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये दुसऱ्या दिवशी अनेक कंपन्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्रात ३ लाख ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी करार केला. तसेच टाटा समूह महाराष्ट्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे राज्यात रोजगाराच्या ३ लाख संधी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या दिवशी तब्बल ६ लाख २५ हजार ४५७ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. दुसऱ्या दिवशीही राज्यात कोट्यवधींची गुंतवणूक आकर्षित झाली आहे.

दावोस परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्र सरकारबरोबर यासंबंधी करार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी, रिअल रिटेल, डेटा कम्युनिकेशन, हॉस्पिटल अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, टाटा समूह महाराष्ट्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

‘काल्सबर्ग’ समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिटेल क्षेत्रात ‘लुलू’ समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. ‘लुईस ड्रेफस’चे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. ‘कॉग्निझंट’चे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

बीड जिल्ह्यात १५ हजार मेगावॉटचा पवनऊर्जा प्रकल्प

‘रिन्यू पॉवर’चे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यात १५ हजार मेगावॉट पाईपलाईन व पवनऊर्जा प्रकल्पाबाबत चर्चा झाली. ‘शिंडर इलेक्ट्रीक इंडिया’चे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे कंपनीच्या विस्तारीकरण योजनांचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री