बिझनेस

महिला प्रवाशांना महिलेसोबत बसण्याचे स्वातंत्र्य; ‘इंडिगो’ची नवीन सुविधा

इंडिगो विमान कंपनीने एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी खास सुविधा देऊ केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडिगो विमान कंपनीने एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी खास सुविधा देऊ केली आहे. महिला प्रवाशांना महिलेच्याच बाजूची सीट मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे. वेब-चेक इन करताना महिला प्रवाशांना महिला प्रवासी कुठे बसलेल्या आहेत याची माहिती मिळू शकेल. प्रवासाची सोय व सुरक्षेसाठी विमान कंपनीने ही सुविधा सुरू केली.

कंपनीने सांगितले की, ही सुविधा देताना कंपनी बाजारपेठेचा अभ्यास केला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी विमान कंपनी कटिबद्ध आहे. वेब चेक-इन करताना हे फीचर काम करणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशाच्या बाजूचीच सीट त्यांना मिळू शकते.

संगणक किंवा स्मार्टफोनच्या सहाय्याने वेब चेक इन केले जाऊ शकते. विमान उडण्यापूर्वी ४८ तास आधी वेब चेक इन केले जाते. तर टेक ऑफच्या दोन तास आधी ही सुविधा बंद होते. आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्यावेळी विमान सुटण्याच्या वेळेपूर्वी २४ तास वेब चेक इन सुरू होते. एक तासभर आधी बंद होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी