Samsung QLED 4K TV Launch in India 
बिझनेस

Samsung TV: सॅमसंग क्यूएलईडी ४के टीव्ही लाँच! घरीच सिनेमा हॉलमध्ये बसल्यासारखा मिळेल फील, जाणून घ्या तपशील

Samsung QLED 4K TV: सॅमसंग क्यूएलईडी ४के टीव्ही नुकताच लाँच झाला आहे. या टीव्हीच्या फीचर्सपासून ते किंमतीपर्यंत सर्वकाही जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीज लाँच केली, जिची किंमत ६५,९९० रूपयांपासून सुरू होते. २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही लाइन-अपमध्‍ये अनेक प्रीमियम वैशिष्‍ट्ये आहेत. २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही ५५ इंच, ६५ इंच आणि ७५ इंच या तीन आकारांमध्‍ये येईल. ही टीव्‍ही सिरीज आजपासून ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह Samsung.com आणि Amazon.in वर उपलब्‍ध आहे.

क्‍वांटम प्रोसेसर लाइट ४के ची शक्‍ती असलेली २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीज क्‍वांटम डॉट आणि क्‍वांटम एचडीआरसह १०० टक्‍के कलर व्‍हॉल्‍यूम देते. या सिरीजमध्‍ये ४के अपस्‍केलिंग देखील आहे, जे वापरकर्त्‍यांना हाय-रिझॉल्‍यूशन ४के कन्‍टेन्‍टचा आनंद देते. तसेच क्‍यू-सिम्‍फोनी साऊंड टेक्‍नॉलॉजी, ड्युअल एलईडी, गेमिंगसाठी मोशन एक्‍सेलरेटर आणि ग्राहकांसाठी कलर फिडेलिटीचे विश्‍वसनीय प्रतीक पॅण्‍टोन व्‍हॅलिडेशन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

''गेल्‍या काही वर्षांमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये झपाट्याने बदल झाला आहे, जेथे वापरकर्ते अधिक सर्वोत्तम व प्रीमियम व्‍युइंग अनुभवाची मागणी करत आहेत. या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आम्‍ही २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीज लाँच केली आहे, जी प्रीमियम व उत्‍साहित व्‍युइंग अनुभव विश्‍वातील आधारस्‍तंभ आहे. नवीन टीव्‍ही सिरीज वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटीसह ४के अपस्‍केलिंग वैशिष्‍ट्य देते, जे स्क्रिनवरील कन्‍टेन्‍टला जवळपास ४के लेव्‍हल्‍सपर्यंत बदलण्‍यासह एकूण व्‍युइंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

क्‍वांटम तंत्रज्ञान

उद्योग मानकांच्‍या पुढे जात २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये शक्तिशाली प्रोसेसर क्‍वांटम प्रोसेसर लाइट ४के आहे, जे व्‍युइंग व साऊंड स्थितींना सानुकूल करते. तसेच, क्‍वांटम एचडीआर वैशिष्‍ट्य सिनेमॅटिक स्‍केलमध्‍ये कॉन्‍ट्रास्‍टची व्‍यापक श्रेणी देते. क्‍वांटम डॉट तंत्रज्ञानामुळे स्क्रिनवर अब्‍जो वास्‍तविक रंगसंगती येतात, ज्‍यामधून विविध ब्राइटनेस स्थितींमध्‍ये अचूक रंगसंगती पाहायला मिळते.

सर्वोत्तम पिक्‍चर क्‍वॉलिटी

अल्टिमेट ४के अपस्‍केलिंग वैशिष्ट्य वापरकर्ते कोणत्‍याही रिझॉल्‍यूशनमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहत असो उच्‍च दर्जाचा व्हिज्‍युअल अनुभव देते. टेलिव्हिजन आपोआपपणे जवळपास ४के लेव्‍हल्‍समध्‍ये अपग्रेड होत असल्‍यामुळे वापरकर्ते वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटीचा आनंद घेऊ शकतात. तसेच पॅण्‍टोन व्‍हॅलिडेशन २००० हून अधिक अचूक रंगसंगतींची खात्री देते आणि ड्युअल एलईडीचे नाविन्‍यपूर्ण बॅकलायटिंग तंत्रज्ञान पाहिले जात असलेल्‍या कन्‍टेन्‍टच्‍या प्रकाराशी जुळणाऱ्या बॅकलाइट कलरला अधिक आकर्षक तर बोल्‍डर कॉन्‍ट्रास्‍ट देते.

भविष्‍यासाठी डिझाइन केलेली सिरीज

२०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये सर्वोत्तम एअरस्लिम डिझाइन आहे, जी लिव्हिंग रूमच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करते. अमर्याद स्क्रिन आणि अॅडजस्‍टेबल स्‍टॅण्‍ड होम एंटरटेन्‍मेंट सेट-अपमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात. टीव्‍ही सिरीज सोलारसेल रिमोटच्‍या मदतीने टिकाऊपणाची अधिक खात्री देखील देते. हा रिमोट बॅटऱ्यांची गरज न भासता ऑपरेट होऊ शकतो. तसेच, एआय एनर्जी मोड ऊर्जा बचत करणारे फायदे देते.

सर्वोत्तम साऊंड

सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट व्‍युइंग अनुभवासाठी २०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये क्‍यू-सिम्‍फोनी, ओटीएस लाइट आणि अॅडप्टिव्‍ह साऊंड वैशिष्‍ट्ये आहेत, जी वापरकर्त्‍यांना स्क्रिनवरील गतीशील पिक्‍चर्सना वास्‍तविक रूपात दाखवतात. ही टीव्‍ही सिरीज रिअल-टाइम कन्‍टेन्‍ट विश्‍लेषणाच्‍या माध्‍यमातून ३डी सराऊंड साऊंड इफेक्‍टची निर्मिती करते, ज्‍यामधून सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव मिळतो.

गेमिंग

२०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये मोशन एक्‍सेलरेटर आणि ऑटो लो लेटन्‍सी मोड (एएलएलएम) आहे, गेमर्ससाठी क्षमता सानुकूल करतात. फ्रेम्‍सदरम्‍यान हालचालींचा अंदाज लावत ही वैशिष्‍ट्ये स्क्रिनवरील मोशनमध्‍ये सुधारणा करतात आणि लो लेटन्‍सीसह जलद फ्रेम ट्रान्झिशन देतात.

इतर स्‍मार्ट फीचर्स

२०२४ क्‍यूएलईडी ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये सॅमसंगची टीव्‍ही प्‍लस सिरीज आहे, ज्‍यामध्‍ये १०० हून अधिक मोफत चॅनेल्‍स आहेत. तसेच, बिल्‍ट-इन मल्‍टी वॉइस असिस्‍टण्‍ट ग्राहकांना विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी देते, तर उच्‍चस्‍तरीय सुरक्षितता सोल्‍यूशन सॅमसंग नॉक्‍स सेफ होम अनुभव देते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी