बिझनेस

आता हिंडनबर्गचे लक्ष्य सुपर मायक्रो कॉम्प्युटर, कंपनीवर केले गंभीर आरोप

अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने मंगळवारी सिलिकॉन व्हॅली-आधारित कंपनी सुपर मायक्रो कॉम्प्युटरला लक्ष्य केले.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने मंगळवारी सिलिकॉन व्हॅली-आधारित कंपनी सुपर मायक्रो कॉम्प्युटरला लक्ष्य केले. हिंडेनबर्गने एक नवीन अहवाल जारी केला आहे. त्यामध्ये आरोप केला की, त्यात आर्थिक व्यवहारातील अनियमितता, निर्यात नियंत्रणातील अपयश आणि सुपर मायक्रो कॉम्प्युटरमधील काही ग्राहकांशी संबंधित समस्या आढळल्या आहेत. हिंडेनबर्ग यांनी दावा केला आहे की त्यांनी कंपनीचे माजी कर्मचारी, उद्योग तज्ञ आणि खटल्यांच्या नोंदी इत्यादींचा आढावा घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या तपासणीनंतर हा अहवाल जारी केला आहे.

सुपर मायक्रो कॉम्प्युटर ही सिलिकॉन व्हॅली येथील सर्व्हर कंपनी आहे. हिंडेनबर्ग अहवालामुळे गुंतवणूकदार आणि उद्योग निरीक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर सुपर मायक्रो कॉम्प्युटरच्या शेअरच्या किमती घसरून कंपनीच्या प्रतिष्ठेवरही विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. सुपर मायक्रो कॉम्प्युटर इंक, कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये ३५ अब्ज डॉलर्स बाजारमूल्य असलेली सर्व्हर निर्माता कंपनी एआय बूममध्येही चांगली कामगिरी करत आहे. हिंडेनबर्गने दावा केला की, २०१८ मध्ये, सुपर मायक्रो देखील आर्थिक विवरणे दाखल करण्यात अयशस्वी झाल्यामुळे नॅसडॅकमधून तात्पुरते हटवण्यात आले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी