मुंबई : तुम्हीही हॅचबॅक कार घ्यायचा विचार करत असाल तर? तर जरा थांबा! कारण आज आम्ही तुमच्यासाठी देशात लवकरच लॉन्च होणाऱ्या 3 हॅचबॅक कारची माहिती घेऊन आलो आहोत. यामध्ये टाटा, सिट्रोएन आणि ह्युंडाईसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
देशात लवकरच येतायत 'या' जबरदस्त हॅचबॅक-
टाटा, ह्युंडाई, सिट्रोएन या कंपन्या येत्या काही महिन्यात त्यांच्या नवीन हॅचबॅक कार लॉन्च करणार आहेत. या कारमध्ये बहुतेक अपडेटेड मॉडेल्स असू शकतात. नवीन टाटा अल्ट्रोज रेसरच्या (Tata Altroz) लॉन्चची पुष्टी झाली आहे, तर ह्युंडाई i20 (Hyundai i20) आणि सिट्रोएन सी-3 (Citroen C3 Automatic) अपडेटेड मॉडेल्सच्या लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप उघड झालेली नाही. तरीही आम्ही तुमच्यासाठी या नवीन कारशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
Tata Altroz Racer: टाटा मोटर्सने अनेक मोटरिंग शोमध्ये आपल्या अल्ट्रोज रेसर कॉन्सेप्ट दाखवली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये देखील तिला सादर करण्यात आलं होतं. उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारं हे वाहन प्रीमियम हॅचबॅक म्हणून सादर करण्यात आलं आहे.
अल्ट्रोझ रेसर पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. ही नवी कार अल्ट्रोज लाइनअपच्या शीर्षस्थानी असेल आणि तिची स्पर्धा थेट Hyundai i20 N Line सारख्या कारशी असेल. नेहमीच्या Altroz पेक्षा वेगळे बनवण्यासाठी तिच्यामध्ये आतून आणि बाहेर काही बदल करण्यात आले आहेत.
Hyundai i20 N Line Facelift: ह्युंडाईने युरोपमध्ये विकल्या जाणाऱ्या i20 N लाइनचा लुक आत आणि बाहेर अपडेट केला आहे. नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील्स, नवीन रेडिएटर ग्रिल आणि इतर अनेक स्पोर्टी फीचर्स या कारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
याशिवाय ग्राहकांसाठी चार नवीन रंगांचे पर्यायही उपलब्ध आहेत. Hyundai ला भारतात N Line मॉडेलचा विस्तार करायचा आहे हे लक्षात घेऊन, कंपनी लवकरच अपडेटेड i20 N Line भारतात लॉन्च करू शकते.
Citroen C3 Turbo AT: सिट्रोएन येत्या काही महिन्यांत कॉम्पॅक्ट हॅचबॅक C3 साठी एक नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय सादर करणार आहे. हे 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कंपनीच्या C3 Aircross SUV मध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.
हा नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स फक्त1.2 लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह प्रदान केला जाईल. या कारची किंमत सध्याच्या मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलपेक्षा सुमारे 1.20 लाख रुपये जास्त असू शकते. याशिवाय कंपनी काही नवीन फीचर्स आणि सेफ्टी टेक्नॉलॉजी देखील समाविष्ट करू शकते.