हिरो स्प्लेंडर  हिरो मोटोकॉर्प
बिझनेस

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

Suraj Sakunde

मुंबई : भारतात एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप-10 दुचाकींच्या डिटेल्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये हिरो स्प्लेंडर ही एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी बनली आहे.

हिरो स्प्लेंडर देशात नंबर १-

एप्रिल 2024 मध्ये हिरो स्प्लेंडर बाईकच्या तब्बल 3,20,959 युनिट्सची विक्री झाली होती. मागील वर्षी याच कालावधीत 2,65,225 युनिट्स होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत या वर्षी एप्रिलमध्ये स्प्लेंडर बाइकच्या विक्रीत 21.01% वाढ झाली आहे.

या यादीत होंडा ॲक्टिव्हा (Honda Activa) स्कूटर दुसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यात एकूण 2,60,300 ॲक्टिव्हा स्कूटरची विक्री झाली. तर एप्रिल 2023 मध्ये फक्त 2,46,016 ॲक्टिव्हा स्कूटर विकल्या गेल्या.

बजाज पल्सरची क्रेझ कायम-

याशिवाय बजाज पल्सरने तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारतात 125cc ते 250cc पर्यंतच्या पल्सर बाइक्स विकल्या जातात. गेल्या महिन्यात एकूण 1,44,809 पल्सर बाईक विकल्या गेल्या. तर एप्रिल 2023 मध्ये फक्त 1,15,371 पल्सर बाईक विकल्या गेल्या.

या यादीत होंडा शाइन बाईक चौथ्या स्थानावर आहे. एप्रिल 2023 मध्ये केवळ 89,261 युनिट्स शाईन बाईक विकल्या गेल्या होत्या, तर एप्रिल 2024 मध्ये शाईन बाईकच्या 1,42,751 युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 53,490 अधिक शाईन बाईक विकल्या गेल्या आहेत.

हिरो एचएफ डिलक्स या लाइनअपमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात हिरोच्या या परवडणाऱ्या बाइकच्या एकूण 97,048 युनिट्सची विक्री झाली होती. तर गेल्या एप्रिल 2023 मध्ये फक्त 78,700 HF डिलक्स बाईक विकल्या गेल्या होत्या.

TVS Raiderची ग्राहकांनी भूरळ-

टीव्हीएस ज्युपिटर आणि सुझुकी एक्सेस स्कूटर या यादीत अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये या दोन स्कूटरच्या अनुक्रमे 77,086 आणि 61,960 युनिट्सची विक्री झाली. मात्र, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या दोघांपैकी केवळ 59,583 आणि 52,231 युनिट्सची विक्री झाली होती.

आठव्या क्रमांकावर TVS Raider आहे, ही बाईक सध्या भारतात सर्वात जलद लोकप्रिय होत आहे. 125cc बाईक सेगमेंटमध्ये, TVS Raider ही मायलेज आणि स्टाइल दोन्हींसाठी ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त