बिझनेस

सॅलरीपेक्षा वर्क - लाइफ बॅलन्स महत्त्वाचा; कंपनी नोकरीबाबत रँडस्टॅडचे सद्यस्थितीवरचे सर्वेक्षण

भारतीय कर्मचारी त्यांच्या कार्यस्थळी प्राधान्यक्रम बदलत असून पारंपरिक प्रेरक घटक जसे की - वेतन, दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय कर्मचारी त्यांच्या कार्यस्थळी प्राधान्यक्रम बदलत असून पारंपरिक प्रेरक घटक जसे की - वेतन, दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. त्याऐवजी कार्यस्थळी लवचिकता (फ्लेक्सिबिलिटी) आणि शिकण्याच्या संधी (लर्निंग अँड डेव्हलपमेंट) अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

रँडस्टॅड इंडिया वर्कमॉनिटर २०२५ सर्वेक्षणानुसार, ५२% कर्मचारी लवचिकता नसलेल्या नोकरीचा त्याग करण्यास तयार आहेत.

६०% कर्मचाऱ्यांच्या मते, त्यांच्या मॅनेजरसोबत चांगले संबंध नसतील तर ते नोकरी सोडतील. हे निष्कर्ष जागतिक ट्रेंडशी सुसंगत आहेत.

जिथे कामगार अधिक अनुकुल, समावेशक आणि भविष्यकाळासाठी सज्ज असलेल्या कार्यस्थळांची मागणी करत आहेत.

रँडस्टॅड इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी विश्वनाथ पी. एस. म्हणाले, भारतीय कार्यस्थळी वेगवेगळ्या पिढ्यांमधील अपेक्षांचा फरक कमी होत चालला आहे. लवचिकता ही आता फक्त एक सुविधा नसून सर्व वयोगटांसाठी ती मूलभूत गरज बनली आहे.

लवचिकता ही फक्त एक पर्याय म्हणून न ठेवता ती कामाच्या रचनेत समाविष्ट केली पाहिजे. त्याचप्रमाणे सतत शिकण्याची मागणी दर्शवते की कर्मचारी फक्त नोकऱ्या शोधत नाहीत.

असे करिअर शोधत आहेत जे त्यांच्यासोबत विकसित होतील, असे विश्वनाथ म्हणाले.

नियोक्त्यांनी हे बदल ओळखले पाहिजेत आणि आपल्या धोरणांमध्ये सुधारणा केली पाहिजे. जोपर्यंत कंपन्या अधिक प्रगतिशील आणि वैयक्तिक गरजांवर आधारित कार्यसंस्कृती देत नाहीत तोपर्यंत त्यांना सर्वोत्तम कर्मचारी गमवावे लागतील, असे रँडस्टॅड इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी विश्वनाथ यांनी या सर्वेक्षणाबाबत आपले निरीक्षण नमूद केले.

मूल्यांशी सुसंगत कंपन्यांमध्ये कामगार काम करू इच्छितात

७०% कर्मचारी म्हणतात की, ते अशा संस्थेत काम करणार नाहीत जी सामाजिक मूल्यांशी जुळत नाही.

६७% कर्मचारी म्हणतात की जर त्यांच्या नोकरीत लर्निंग आणि डेव्हलपमेंट संधी नसेल तर ते ती नोकरी सोडतील (जागतिक पातळीवर हा आकडा फक्त ४१% आहे).

६९% भारतीय कर्मचारी कार्यस्थळी ‘आपलेपणा’ हवा, तर जागतिक स्तरावर हे प्रमाण ५५% आहे.

६०% भारतीय कर्मचारी फ्लेक्सिबल वर्किंग तास नसतील तर नोकरी नाकारतील, असे मानतात.

५६% कर्मचारी म्हणतात की, कामाच्या ठिकाणाबाबत लवचिकता नसेल तर ते संधी स्वीकारणार नाहीत.

७३% उत्तरदात्यांनी सांगितले की, जर कंपन्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन फ्लेक्सिबल तास आणि वर्क लोकेशन यांसारखे फायदे दिले, तर त्यांचा नियोक्त्यांवरील विश्वास अधिक वाढेल.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री