मनोरंजन

Purush: 'पुरुष' वेबसिरीज लवकरच येणार OTT वर!

Jaywant Dalvi: ओटीटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या वेबसिरीजची घोषणा करण्यात आली असून या टीझरला रसिकांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Tejashree Gaikwad

Planet Marathi OTT: प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच धमाकेदार विषय प्रेक्षकांकरिता घेऊन येतचं असतो . 'रानबाजार'च्या जागतिक यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला 'पुरुष' ही नवीन वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. नुकतेच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या वेबसिरीजची घोषणा करण्यात आली असून या टीझरला रसिकांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'पुरुष' ही वेबसिरीज जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित आहे. समाजरचनेतील पुरुषी अहंकार आणि त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार तसेच वास्तविक जीवनावर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत आणि अभिजित पानसे, श्रीरंग गोडबोले, प्रसन्न आजरेकर यांनी निर्मिती केली आहे. सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

अभिजित पानसे घोषणेबाबत म्हणतात, "पुरुष ही वेबसिरीज पुरुष स्त्रियांबद्दल काय विचार करतात. स्त्रियांना माणूस म्हणून नाही तर लैंगिक वस्तू म्हणून पाहिलं जातं. याबद्दल स्त्रियांची प्रतिक्रिया या वेबसिरीजमध्ये पाहण्यासारखी आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रत्येक स्त्री पुरुषाने बघायला हवी."

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "अभिजित पानसे आणि प्लॅनेट मराठीच घट्ट नातं आहे. त्यांनी केलेली 'रानबाजार' वेबसिरीजला भरघोस यश मिळाल्यानंतर आता 'पुरुष' वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर घेऊन येत आहोत. रानबाजार बघितल्यावर त्या वेबसिरीजचं कौतुक श्री. शाम बेनेगल, श्री. अमोल पालेकर, श्री. एन. चंद्रा यासारख्या दिग्गज व्यक्तींनी देखील केले आहे. अभिजित पानसे हे केवळ मराठीतीलच नव्हे तर देशातील एका उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते कायम वेगळे प्रयोग करत असतात. पुरूष ही वेबसिरीज अशा प्रकारे तुम्हाला पहायला मिळेल की असा प्रयोग जगात पहिल्यांदाच समोर येईल. त्यामुळे ह्या वेबसिरीजला भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही."

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव’ चित्ररथाची मोहिनी; संस्कृती, परंपरा आणि स्वावलंबनाचे दर्शन, Video व्हायरल

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पराक्रमाचं दर्शन; लढाऊ विमानांची दिमाखदार परेड, पाहा Video

Republic Day 2026 : शिवाजी पार्क ते बीएमसी मुख्यालय; मुंबईत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, Video

Mumbai : परळ आगाराच्या विश्रांतीगृहात आढळल्या दारूच्या बाटल्या; बस आगाराची स्वतंत्र विभागीय चौकशी

मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड