मनोरंजन

Ruslaan Box Office: सलमान खानच्या मेहुण्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला, ७ दिवसात बॉक्स ऑफिसला केलं अलविदा!

Aayush Sharma: आयुष शर्मा आणि सुश्री श्रेया मिश्रा 'रुस्लान'मध्ये लीड स्टारकास्ट आहे.

Tejashree Gaikwad

Salaman Khan Brother in Law: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माचा 'रुस्लान' या शुक्रवारी (२६ एप्रिल) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ट्रेलर हा चित्रपट ॲक्शन आणि इमोशनने भरलेला आहे. तरीही हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचू शकला नाही. एकामागून एक फ्लॉप चित्रपट देऊनही सलमान खान आणि मेहुणा आयुष शर्मा मोठ्या पडद्यावर नशीब आजमावण्यापासून मागे हटत नाहीत. 'लव्हयात्री' या चित्रपटातून लव्हर बॉय म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आयुष शर्माने त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'रुसलान' चित्रपटात ॲक्शनने प्रेक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यातही यश आले नाही.

कधी रिलीझ झाला हा सिनेमा?

२६ एप्रिल रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल झाला. आयुष शर्मा आणि सुश्री श्रेया मिश्रा 'रुस्लान'मध्ये लीड स्टारकास्ट आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ११ दिवस झाले आहेत, परंतु चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांनंतर बॉक्स ऑफिसला अलविदा केला आहे.

का चालला नाही हा सिनेमा?

करण ललित भुतानी दिग्दर्शित या सिनेमात भरपूर ॲक्शन आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आयुष शर्माने कोणतीही कसर सोडली नाही. पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयुषच्या मागील चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाचे प्रमोशन सलमान खानने केले नव्हते. मात्र, भाईजानची साथ न मिळाल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे बुडाला अशी चर्चा आता सुरु आहे.

७ दिवसात किती कमाई केली?

रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने ६ लाखांची कमाई केली. अजय देवगणच्या 'मैदान' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ'ने बॉक्स ऑफिसवर आयुष शर्मा स्टारर 'रुस्लान'ला टिकू दिला नाही. Sakanlik.com च्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा केवळ सात दिवसांचा व्यवसाय झाला असून या चित्रपटाने भारतात एका आठवड्यात निव्वळ ४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

स्टार कास्ट

रुसलानमध्ये आयुष शर्मा आणि सुश्री यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर साऊथचा सुपरस्टार जगपती बाबूने या चित्रपटात अभिनेत्याच्या सावत्र वडिलांची भूमिका साकारली होती. रुसलानमध्ये सुनील शेट्टीने कॅमिओही केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी