मनोरंजन

Milind Safai : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ; वयाच्या ५३ व्या वर्षी ठेवला देह

मिलिंद सफई यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे

नवशक्ती Web Desk

'आई कुठे काय करते' या मराठी मालिकेत अरुंधतीच्या वडीलांची भुमिका साकारणारे मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं आहे. त्यांना कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. आज सकाळी १०.४५ वाजता वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला, एक उत्कृष्ट कलाकार, हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद सफई यांची ओळख होती. मिलिंद सफई यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक मालिकांमधून त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे.

मिलिंद सफई यांना कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. अखेर सफई यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मराठी टिव्ही विश्वात गाजलेली मालिका 'आई कुठे काय करते' यात सफई यांनी सुरुवातीला काम केलंय हे खूप कमी लोकांना माहिती असेल. तसंच मिलिंद यांनी अनेक मराठी मालिका, सिनेमा आणि नाटकात अभिनय केला आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पहिल्याच दिवशी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

Goa Nightclub Fire : नाइट क्लबचे दोन्ही मालक थायलंडला पसार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन; वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

‘वंदे मातरम’वर चर्चेची गरजच काय? प्रियांका गांधी यांचा लोकसभेत सवाल

'वंदे मातरम'वरून गोंधळ; काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले - मोदी