मनोरंजन

Khel Khel Mein Trailer: अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने झाला रिलीज!

Akshay Kumar: अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, अम्मी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जैस्वाल आणि फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

Tejashree Gaikwad

अक्षय कुमार स्टारर कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'खेल खेल में'चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर मजेदार कौटुंबिक मनोरंजनाची एक झलक आहे ज्यामध्ये खिलाडी कुमार आणि तापसी पन्नू, वाणी कपूर, एमी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जैस्वाल आणि फरदीन खान सारख्या प्रतिभावान कलाकारांसह त्यांच्या मजेदार शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहेत.

मुदस्सर अझीझ दिग्दर्शित, "खेल खेल में" मध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, अम्मी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जैस्वाल आणि फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत. लोकांशी जोडल्या जाणाऱ्या भावना आणि विलक्षण विनोद यांचा मिलाफ करून, हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी तयार आहे , सर्व चित्रपट रसिकांसाठी हा चित्रपट पहायलाच हवा.

गुलशन कुमार, टी-सीरीज आणि वाकाऊ फिल्म्स खेल खेल में या सिनेमा घेऊन आले आहेत. टी-सीरीज फिल्म, वकाऊ फिल्म्स आणि केकेएम फिल्म प्रोडक्शन, खेल खेल में हे मुदस्सर अझीझ यांनी दिग्दर्शित केले आहे आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली