मनोरंजन

हेरा-फेरी सिक्वलमध्ये अक्षय कुमारची पुन्हा एंट्री ? कार्तिक आर्यनचा पत्ता कट

अक्षयने मानधनामुळे नाही तर कथेमुळे चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र

वृत्तसंस्था

'हेरा फेरी' (Hera Pheri) चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटावर निर्माता आणि दिग्दर्शक काम करत असल्याची माहिती आहे. पण, त्याप्रमाणेच चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती, की या चित्रपटात अक्षय (Akhshay Kumar) नव्हे तर कार्तिक आर्यन (Kartik Aryan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटरवर कार्तिक आर्यनच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, आता अक्षय कुमार या चित्रपटात पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला अक्षयला चित्रपटात परत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हेरा फेरी फ्रँचायझीमध्ये अक्षय राजूच्या भूमिकेत परतण्याची चर्चा आहे. 

रिपोर्ट्सनुसार, गेल्या 10 दिवसांत फिरोजने सर्व मतभेद दूर करण्यासाठी आणि त्याला फ्रँचायझीमध्ये परत आणण्यासाठी 2 वेळा अक्षय कुमारची भेट घेतली आहे. अक्षयचे पात्र चित्रपटासाठी किती महत्त्वाचे आहे याची फिरोजला जाणीव आहे. त्यामुळे त्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'हेरा फेरी' असा चित्रपट आहे जो अक्षय कुमारशिवाय बनू शकत नाही. म्हणूनच निर्माते मूळ कलाकारांसह तिसर्‍यांदा हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय कॉमिक फ्रँचायझी परत आणण्यास उत्सुक आहेत आणि सध्या त्यावर काम करत आहेत. अक्षयने फिरोजसोबत 'हेरा फेरी 3' बनवण्यातही रस दाखवला आहे. अक्षयने मानधनामुळे नाही तर कथेमुळे चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अक्षयला परत आणण्यासाठी स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव