मनोरंजन

दिशा पटानीच्या आयुष्यात 'अलेक्झांडर', हातावर काढला खास टॅटू ; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

अलेक्झांडर हा दिशाचा बॉयफ्रेंड असून तो एक व्यावसायिक मॉडेल आहे. त्यानं गिरगिट नावाच्या वेबसीरिजमधून डेब्यू केल्यापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता

नवशक्ती Web Desk

प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या पर्सनल लाईफवरुन कायम चर्चेत असते. दिशा आता तिच्या बॉयफ्रेंडच्या नावामुळे आणि त्यानं हातावर काढलेल्या टॅटूमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अलेक्झांडर हा तिचा बॉयफ्रेंड असून तो एक व्यावसायिक मॉडेल आहे. त्यानं गिरगिट नावाच्या वेबसीरिजमधून डेब्यू केला होता. तेव्हा पासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचं दिशा पटानी सोबत नाव घेतले जाऊ लागले आहे.

काही दिवसांपासून अलेक्झांडर आणि दिशा या दोन्ही सेलिब्रेटींच्या नावाची चर्चा चांगत आहे. दिशा ही तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफवरुन नेहमी ट्रेंडिंगमध्ये असते आहे. दिशाच्या बॉयफ्रेंड अलेक्झांडरचा एक व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. त्यानं हातावर एक टॅटू काढला आहे. त्यावरुन चाहत्यांनी त्या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलंय.

अलेक्झांडच्या हातावरील तो टॅटू अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. दिशानं तिच्या इंस्टास्टोरीवरुन तो व्हिडिओ शेयर केला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसऱ्या व्हिडिओत दिशा आणि टायगरची बहिण कृष्णा पोझ देत फोटो काढताना दिसत आहे. अलेक्झांडरनं हाथावर जो टॅटू काढला आहे त्यात दिशाचा चेहरा दिसून येत आहे.

अलेक्झांडरच्या हातावरील हा टॅटू सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. एका युझर्सनं प्रतिक्रिया दिली आहे की, "तुम्ही दोघे खूपच सुंदर दिसत आहात. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा". गेल्या काही दिवसांपासून त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोंवरही चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या होत्या. या सगळ्यात गुगलवर दिशाचा बॉयफ्रेंड अलेक्झांडर हा नेमका आहे तरी कोण? याचा शोध तिचे चाहते घेताना दिसत आहेत.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

महिला डॉक्टरचा हिजाब ओढला; नितीश कुमारांवर टीकेची झोड, "तुमची तब्येत ठीक नसेल तर...

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने किडनी विकली; रोहित पवार आक्रमक, "या निर्दयी सरकारवर...

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?