Photo: Instagram (aliaabhatt)
मनोरंजन

जवळच्याच व्यक्तीने केला आलिया भट्टचा विश्वासघात; ७७ लाखांचा घातला गंडा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी चर्चेचे कारण तिचा नवा सिनेमा नाही, तर तिच्याच विश्वासू व्यक्तीने...

Mayuri Gawade

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी चर्चेचे कारण तिचा नवा सिनेमा नाही, तर तिच्याच विश्वासू व्यक्तीने केलेला मोठा विश्वासघात आहे. आलियाची पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश शेट्टी हिने लाखोंची रक्कम परस्पर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आता वेदिकाला अटकही करण्यात आली आहे. वेदिका आलिया भट्टची पर्सनल असिस्टंट म्हणून दोन वर्षं काम करत होती.

जुहू पोलिसांनी वेदिकाला अटक केली असून, तिच्यावर ७६,९०,८९२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही रक्कम आलियाच्या वैयक्तिक बँक खात्याबरोबरच तिच्या 'इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स' या प्रोडक्शन हाऊसच्या खात्यातूनही फसवणूक करून उचलण्यात आली होती.

कोण आहे वेदिका प्रकाश शेट्टी?

वेदिका शेट्टी ही आलिया भट्टची पर्सनल असिस्टंट म्हणून दोन वर्षं काम करत होती. याच काळात तिने आलियाचे अनेक महत्त्वाचे व्यवहार, आर्थिक निर्णय, कंपनीचे ऑपरेशन्स आणि वैयक्तिक कामं सांभाळली. इतकंच नाही तर ती आलियाची खोटी स्वाक्षरी करून बोगस पेमेंट्स करत होती. संशयास्पद पेमेंट लिंक आलियाला मिळाल्यानंतर झालेल्या चौकशीत हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. ऑडिटमध्ये ७६,९०,८९२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालं, आणि आलियाच्या आई सोनी राजदान यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली.

या प्रकरणामुळे केवळ आलियाच नव्हे तर तिची संपूर्ण टीम हादरली आहे. घरातील व्यक्तीसारख्या जवळच्या कर्मचाऱ्यानेच असा विश्वासघात केल्याने हा प्रकार अधिक धक्कादायक ठरतो.

आलियाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर सध्या 'अल्फा' या स्पाय युनिव्हर्स फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शर्वरी वाघसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार असून, हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत