गेल्या वर्षातील बॉलिवूडचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणजे रणबीर कपूरचा 'ॲनिमल'. रणबीरचा हा चित्रपट आता 'ओटीटी'वर प्रदर्शित होणार आहे. 'नेटफ्लिक्स' या ओटीटीवर तो नेटकऱ्यांना तो पाहता येणार आहे. मात्र ओटीटीच्या चाहत्यांसाठी मेकर्सने आणखी एक बातमी शेअर केली आहे. एका मुलाखतीमध्ये संदीप रेड्डीने सांगितले होते की, ओटीटीवर जेव्हा 'ॲनिमल' प्रदर्शित होईल तो थिएटरपेक्षा वेगळा असणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित करताना आम्ही काही वेगळे प्लॅन केले आहेत.
एक्स्ट्रा ९ मिनिटांत काय?, ' या ' तारखेला भेटीला-
ॲनिमलचा रनटाईम हा सुरुवातीला ३ तास २१ मिनिटं एवढा होता. आता तो जेव्हा ओटीटीवर येईल त्यावेळी त्याचा कालावधी हा ३ तास २९ मिनिटे असणार आहे. हे त्या मुव्हीचे एक्सटेंडेड व्हर्जन असणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲनिमलच्या ओटीटी डेब्यूची चर्चा चांगलीच रंगली होती. याबद्दल सविस्तर वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. सेन्सॉर बोर्डानं 'ॲनिमल' या चित्रपटाला 'A सर्टिफिकेट' दिले होते. अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीनचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनमध्ये काही बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. त्या अधिकच्या ९ मिनिटांमध्ये काय असणार याची प्रेक्षकांना, नेटकऱ्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या २६ जानेवारी रोजी रणबीर कपूरचा ॲनिमल हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ॲनिलमलचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार-
ॲनिमल हा गेल्या वर्षी डिसेंबरच्या १ तारखेला प्रदर्शित झाला होता. 'कबीर सिंग','अर्जुन रेड्डी'चे दिग्दर्शन करणाऱ्या संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटामध्ये रश्मिक मंदाना, शक्ती कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यात बॉबीच्या भूमिकेने देखील रणबीर कपूरला जोरदार फाईट दिल्याचे दिसून आले आहे. पुढील वर्षी ॲनिलमलचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.