मनोरंजन

'अनुपमा' रुपाली गांगुलीने केला खुलासा, सेटवर होतो 'या' खास व्यक्तीचा भास

स्टारप्लसवरील प्रेक्षकांचा सर्वात आवडता फॅमिली ड्रामा शो 'अनुपमा'ला दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रचंड यश मिळत आहे.

विक्रांत नलावडे

स्टारप्लसवरील प्रेक्षकांचा सर्वात आवडता फॅमिली ड्रामा शो 'अनुपमा'ला दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रचंड यश मिळत आहे. तसेच, या मालिकेची व्यूअरशिप मोठी असून, आपल्या आकर्षक कथानक आणि उत्कृष्ट प्रदर्शनानी हा शो भारतातील टॉप रेटेड हिंदी फिक्शन शो बनला आहे. २०२०मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला दर आठवड्याला टॉप टीआरपी रेटिंग मिळत आहे. अशातच, 'अनुपमा'ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपैकी हा एक बनली असून, आपले जबरदस्त यश दाखवले आहे. हा विशेष प्रसंग आणि सर्वांचे कठोर परिश्रम लक्षात घेत, टीमने एक सेलिब्रेशन केले जिथे प्रत्येकाचे प्रयत्न आणि त्यांच्या योगदानाबद्दल टीमने कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर टीमने केक कटिंग सेरेमनीचे आयोजन केले.

या प्रसंगी शोची टीम उपस्थित होती. यादरम्यान रुपाली गांगुली उर्फ ​​अनुपमा स्टेजवर सर्वांना संबोधित करत म्हणाल्या, "राजन शाही तुम्ही एक जादूगार आहात आणि मी तुमची आभारी आहे. आणि आम्ही जे आहोत त्यासाठी स्टार प्लसचे देखील आभार. आपण कुठेही गेलो तरी लोक मला रूपालीऐवजी अनुपमा म्हणतात याचा आनंद वाटतो, अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी कामावर परत येण्यासाठी मी खूप उत्साहित असते आणि मला आशा आहे की हा उत्साह कायम राहील. आपण पुढे जात राहू. त्या पुढे म्हणाल्या, "२०१६ मध्ये मी माझे वडील गमावले, पण जेव्हा मी सेटवर येते तेव्हा मला त्यांची उपस्थिती जाणवते. त्यामुळे हे माझे घर आहे. हे माझे घर आहे आणि मी सेटवर किमान १२ तास असते आणि मला दररोज येथे राहणे आवडते. तुम्हा सर्वांचे खूप आभार."

या शोमध्ये अनुपमाची व्यक्तिरेखा रुपाली गांगुली साकारत आहे, तर अनुज कपाडियाच्या भूमिकेत गौरव खन्ना आणि वनराज शाहच्या भूमिकेत सुधांशू पांडे आहेत. अनुपमा ही स्टार प्लसवरील इंडियन हिंदी भाषेतील टेलिव्हिजन ड्रामा सिरीज आहे. डायरेक्टर कट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली राजन शाही आणि दीपा शाहीद्वारा निर्मित हा शो स्टार प्लसवर रात्री १० वाजता प्रसारित होतो.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त