मनोरंजन

Berlin Movie: जागतिक महोत्सव गाजवलेला ‘बर्लिन’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, आहे स्पाय थ्रिलर सिनेमा

Tejashree Gaikwad

Aparshakti Khurana, Ishwak Singh, Rahul Bose: भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकाराने आज त्याच्या आगामी अभूतपूर्व गुप्तहेर थरारपट 'बर्लिन'ची घोषणा केली. या सिनेमाने आंतरराष्ट्रीय सिने-वर्तुळात तुफान धुमाकूळ घातला आहे. १९९० च्या दशकातील नवी दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आधारित, अशा प्रकारच्या या पहिल्या हेरगिरीच्या नाट्याने जगभरातील विविध प्रतिष्ठित सिने-महोत्सवांमध्ये समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. वाढत्या कौतुकात यादीत भर म्हणजे १७ ऑगस्ट रोजी हॉयट्स सिनेमामध्ये मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (आयएफएफएम २०२४) 'बर्लिन' देखील प्रदर्शित करण्यात आला. प्रसिद्ध सिने-कर्ते अतुल सभरवाल दिग्दर्शित 'बर्लिन'मध्ये अपारशक्ती खुराना, इश्वक सिंग, राहुल बोस, अनुप्रिया गोएंका आणि कबीर बेदी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरी आणि विशिष्ट कथाकथनासाठी कौतुक केलेली उच्च दर्जाची कलाकृती, गुप्त क्रियाकलाप, फसवणूक आणि नैतिक संदिग्धतेची एक चित्तवेधक कथा असल्याचे वचन देते. झी स्टुडिओज आणि यिप्पी की याय मोशन पिक्चर्सद्वारे निर्मित, 'बर्लिन' आता झी५ वर त्याच्या विशेष प्रीमिअरची सज्ज आहे.

काय आहे कथा?

'बर्लिन' प्रेक्षकांना दिल्लीतील १९९० च्या दशकातील हिवाळ्यात घेऊन जातो, जिथे हेरगिरीचे एक शांत वादळ तयार होत आहे. ही कथा तीन मुख्य पात्रांभोवती फिरते. ज्यांचे जीवन अनपेक्षित मार्गांनी टक्कर देणार आहे. विदेशी गुप्तहेर असल्याचा आरोप असलेल्या एका बहिरा-मूक तरुणाच्या एका असामान्य परंतु आव्हानात्मक भूमिकेत इश्वाक सिंग दिसेल. अपारशक्ती खुराना, त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत, शांततेत लपलेल्या रहस्यांचा भेद करणाऱ्या सांकेतिक भाषेच्या तज्ज्ञाच्या रूपात दिसेल. अनुप्रिया गोएंका एक गूढ एजंट म्हणून आगीची धग अधिकच तीव्र करेल, तिच्या अस्सल निष्ठेला गूढतेची किनार आहे. दरम्यान, राहुल बोस केवळ बाह्य दुनियेतील धोक्यांशीच नव्हे तर स्वतःच्या एजन्सीतील सावल्याशीही लढा देणाऱ्या एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या रूपात दिसेल. फसवणुकीचे थर जसजसे गळून पडतील तसतशी युती बदलत जाते आणि प्रश्न वाढत जातातः अशा जगात सगळं धूसर आहे आणि विश्वासघाताच्या या मोठ्या डाव-पेचात जिवंत बाहेर पडेल कोण?

झी५चे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले, "आम्ही आमच्या मंचावर 'बर्लिन' सादर करण्यास उत्सुक आहोत, ही कलाकृती विविध प्रेक्षक विभागांसह प्रतिध्वनित होणाऱ्या दर्जेदार कंटेंटच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. हा सिनेमा झी५च्या विस्तृत लायब्ररीत भर घालणारा आहे, जो कथाकथनाच्या सीमांना धक्का देणाऱ्या आकर्षक कथा सादर करण्याच्या आमच्या चालू असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. चमकदार कलाकार, गुंतागुंतीचे कथानक आणि १९९० च्या दशकातील दिल्लीच्या पार्श्वभूमीतील अशा प्रकारची पहिली कथा असलेल्या 'बर्लिन'ने आंतरराष्ट्रीय सिने- महोत्सवांमध्ये समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. भारतीय स्ट्रीमिंग बाजारासाठी हेरगिरीच्या प्रकारात एक नवीन मापदंड स्थापित करेल, हा आमचा विश्वास आहे. आमच्या विद्यमान ग्राहकांसाठी आणि दर्जेदार मनोरंजन शोधणाऱ्या नवीन प्रेक्षकांसाठी झी५चे आकर्षण आणखी वाढवेल".

झी स्टुडिओ’चे CBO उमेश केआर बन्सल म्हणाले, “बर्लिन' हा झी स्टुडिओच्या वैविध्यपूर्ण पर्यायांमध्ये एक अभूतपूर्व भर घालणारा सिनेमा आहे, जो एका प्रखर गुप्तहेर थराराद्वारे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय युग टिपत आहे. त्याची जागतिक प्रशंसा पाहून आम्हाला अभिमान वाटतो आणि ही आकर्षक कथा आमच्या झी५ प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”

यिप्पी की याय मोशन पिक्चर्स निर्माते मानव श्रीवास्तव म्हणाले, “बर्लिन' च्या शुभारंभासाठी झी५ सोबत हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे. हा मंच आम्हाला हा गुंतागुंतीचा, उच्च दर्जाचा गुप्तहेर थरार संपूर्ण भारत आणि त्यापलीकडे विशाल आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी परिपूर्ण मंच प्रदान करतो. 'बर्लिन' हा एक असा चित्रपट आहे जो भारतीय आशयातील हेरगिरीच्या शैलीच्या सीमांना पुढे ढकलतो आणि आम्हाला आनंद आहे की लवकरच तो प्रेक्षकांना पाहण्यासाठी मंचावर प्रदर्शित होईल. झी५ सोबतची ही भागीदारी आम्हाला अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल असा आम्हाला विश्वास आहे."

फिल्ममेकर अतुल सभरवाल म्हणाले, “बर्लिन'सह आम्ही एक स्पाय थ्रिलर तयार केला आहे. जो प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचविण्याची खात्री देतो. अपारशक्ती आणि इश्वक यांच्यातील पडद्यावरील केमिस्ट्री तोडीस तोड असून एक अशी मेजवानी आहे जी प्रेक्षकांना खूप आवडेल हे मि विश्वासाने सांगू शकतो. आमचे दूरदर्शी निर्माते आणि प्लॅटफॉर्म जायंट झी५ सोबत अशा अष्टपैलू कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे हे कोणत्याही चित्रपट निर्मात्याचे स्वप्न असते. आम्ही या प्रकल्पात मन आणि आत्मा ओतला आहे. आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल ही आशा वाटते. संपूर्ण टीम उत्सुक असून प्रीमिअरची आतुरतेने वाट पाहत आहे. 'बर्लिन' हे ही प्रेमाने केलेली मेहनत आहे. ही कलाकृती कधी एकदा जगासमोर येते असं झाले आहे. "

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला