मनोरंजन

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास लावून आत्महत्या ; कर्जतमधील स्टुडिओत संपवलं जीवन

नवशक्ती Web Desk

प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं. ९ ऑगस्ट रोजी देसाई यांचा वाढदिवस असतो. त्याच्या काही दिवस आधीचं त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं. ९ऑगस्ट रोजी नितीन देसाई हे वयाचे ५८ वर्ष पुर्ण करणार होते.

देसाई हे प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक होते. त्यांना कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना 'हम दिल दे चुके सनम', 'जोधा अकबर' आणि 'लगान' यांच्यासह अन्य काही ब्लॉक बस्टर चित्रपटांसाठी भव्य सेट डिझाइन करण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि इतर अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं होतं.

देसाई यांनी २००५ साली मुंबई बाहेर कर्जत येथे आपला महत्वकांक्षी एनडी स्टुडिओ उभारला होता. हा स्टुडिओ तब्बल ५२ एकरमध्ये पसरलेला असून यात अनेक चित्रपटांचे सेट उभारलेले आहेत. यात 'जोधा अकबर' सिनेमाचा सेट हा प्रमुख मानला जातो. त्यांच्या एनडी स्टुडिओत केवळ चित्रपटच नाही, तर 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचे अनेक सिझन शूट करण्यात आले होते.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला