मनोरंजन

कचऱ्यातून उलगडणारी एक मानवी कथा; 'अवकारिका'चा ट्रेलर प्रदर्शित

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनातील कठोर वास्तव आणि त्यांच्या श्रमांची अवहेलना यावर भाष्य करणारा ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून भावनिक प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच "आरं माणूस म्हणून काय किंमत आहे की नाही आपल्याला?" या वाक्याने अंगावर काटा येतो.

नेहा जाधव - तांबे

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनातील कठोर वास्तव आणि त्यांच्या श्रमांची अवहेलना यावर भाष्य करणारा ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून भावनिक प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच "आरं माणूस म्हणून काय किंमत आहे की नाही आपल्याला?" या वाक्याने अंगावर काटा येतो.

या चित्रपटातून समाजात दुर्लक्षित राहिलेल्या स्वच्छतादूतांच्या आयुष्यातील वास्तव आणि त्यांची घुसमट अधोरेखित करण्यात आली आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन CA अरविंद जनार्दन भोसले यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनीच सांभाळली आहे. तर, चित्रपटात अभिनेता विराट मडके याने स्वच्छतादूताची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेलं हे पात्र संवेदनशील, संघर्षशील आणि प्रेरणादायी आहे. त्याच्यासोबत राहुल फलटणकर, रोहित पवार, पिया कोसुम्बकर आणि स्नेहा बालपांडे यांच्याही भूमिका महत्त्वपूर्ण आहेत.

चित्रपटात बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने आणि कर्तिकी बत्ते यांचाही समावेश असून सहाय्यक कलाकारांमध्ये प्रफुल कांबळे, पूजा वाघ, पंकज धुमाळ, डॉ. नितीन लोणदे, विनोद खुरूंगळे, महादेव जाधव आणि नितीन बानसोडे यांचाही सहभाग आहे.

या चित्रपटातील गाणी कैलाश खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Redbud Motion Pictures या बॅनरअंतर्गत साकारण्यात आलेला ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनातील अस्वस्थ करणारे वास्तव आणि त्यामागे दडलेली माणूस म्हणून ओळख मिळवण्याची धडपड या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

स्वच्छता श्रमाची जाणीव निर्माण होण्यासाठी तसेच स्वच्छतेविषयी प्रभावी जनजागृती घडवण्यासाठी ‘अवकारीका’ ही कलाकृती साकारण्यात आली आहे.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल