मनोरंजन

Big Boss 16 : 'बिग बॉस'च्या कॅप्टन्सी टास्कमध्ये शिव ठाकरेने जिंकली प्रेक्षकांची मने

'बिग बॉस १६'मध्ये (Big Boss 16) नव्या कॅप्टनची निवड ही थेट प्रेक्षांमधून करण्यात आली. एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक हेदोघेही होते उमेदवार

प्रतिनिधी

'बिग बॉस १६'च्या (Big Boss 16) नव्या भागामध्ये घराचा नवीन कॅप्टन म्हणून प्रेक्षकांनी मराठमोळ्या शिव ठाकरेंची निवड केली. शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक या तीन सदस्यांना कॅप्टन्सीचे उमेदवार म्हणून निवडण्यात आले होते. तर, पहिल्यांदाच थेट प्रेक्षक बिग बॉसच्या घरात गेले. एवढाच नव्हे तर त्यांनी घरातील सदस्यांशी संवाददेखील साधला. तीनही उमेदवारांना कॅप्टन्सीसाठी तीन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये परफॉर्म करण्यास सांगितले. त्यानंतर थेट प्रेक्षकांना बॅलेमध्ये तिघांनाही मते देण्यास सांगितले.

बिग बोसने जाहीर केले होते की, नव्या भागामध्ये घरातील पुढच्या कॅप्टनची निवड वोटिंग बॅलेटच्या आधारे केली जाईल. त्यानंतर तिघांनाही टास्क देण्यात आले. एका फेरीमध्ये त्यांना एकमेकांवर टीका करण्यास आणि ते इतर दोघांपेक्षा चांगले का आहेत? हे सांगण्याचा टास्क दिला. पण तिघांनी एकमेकांबद्दल एकही वाईट गोष्ट सांगितली नाही. याउलट तीनही फेऱ्यांमध्ये तिघेही एकमेकांचा प्रचार करत होते. त्यानंतर एका सेगमेंटमध्ये अर्चनाला हा टास्क कोण जिंकणार? असं विचारले. तिने एमसी स्टॅन आणि अब्दूचे नाव घेतले. पण निकालामध्ये शिव ठाकरेने बाजी मारली. अर्चना धक्का बसला आणि तेव्हा 'हा टास्क शिव कसा जिंकू शकतो?' असं बोलताना म्हणाली. त्यावर 'शिव हा सर्वसामान्यांचं प्रतिनिधीत्व करतो, त्यामुळे तो लोकांना आवडतो' असं साजिद खान म्हणाला.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण