सुभाष घई 
मनोरंजन

सुभाष घई यांनी केली २४ कोटींच्या आलिशान अपार्टमेंटची खरेदी; उच्चभ्रू घरांसाठी वाढती मागणी अधोरेखित

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई यांनी अंधेरीतील अपार्टमेंट रु. १२.५ कोटींना विकल्यानंतर अवघ्या आठवडाभरात वांद्रे पश्चिम, मुंबई येथे रु. २४ कोटींच्या उच्चभ्रू अपार्टमेंटची खरेदी केली आहे.

Swapnil S

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई यांनी अंधेरीतील अपार्टमेंट रु. १२.५ कोटींना विकल्यानंतर अवघ्या आठवडाभरात वांद्रे पश्चिम, मुंबई येथे रु. २४ कोटींच्या उच्चभ्रू अपार्टमेंटची खरेदी केली आहे, अशी माहिती स्क्वेअर यार्ड्सने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांमधून समोर आली आहे. ही खरेदी फेब्रुवारी २०२५ मध्ये नोंदवली गेली आहे.

ही मालमत्ता एम. जे. शहा ग्रुपच्या '८१ ऑरिएट' या उच्चभ्रू निवासी प्रकल्पात असून ४,३६४ चौरस फूट (४०५.४२ चौ.मी.) चटई क्षेत्रफळ आणि ५,२३९ चौरस फूट (४८६.६९ चौ.मी.) बिल्ट-अप क्षेत्रफळ आहे. व्यवहारात तीन कार पार्किंग जागांचा समावेश आहे. यासाठी ₹१.४४ कोटी स्टॅम्प ड्युटी आणि ₹३०,००० नोंदणी शुल्क भरले गेले आहे.

वांद्रे पश्चिम हे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांच्या पसंतीचे ठिकाण मानले जाते, कारण हे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा-वर्ली सी लिंक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी मेट्रो नेटवर्कला सहज जोडले गेले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने याच प्रकल्पातील एक अपार्टमेंट नुकतेच ₹२२.५० कोटींना विकले आहे, परंतु IGR नोंदीनुसार तिच्याकडे अजूनही '८१ ऑरिएट'मध्ये एक युनिट आहे.

घई यांची ही गुंतवणूक मुंबईतील आलिशान गृहनिर्माण क्षेत्रात उच्चभ्रू घरांसाठी असलेली वाढती मागणी अधोरेखित करते.

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील ST डेपो दुर्लक्षित; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन, शिवसेना उबाठा आक्रमक

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा