मनोरंजन

मुंबईत पुन्हा कोरोना? अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला झाली लागण; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबईत पुन्हा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. यासोबतच शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून, त्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईत पुन्हा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. यासोबतच शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून, त्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. अशा पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, तिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे. शिल्पा सध्या उपचार घेत असून, तिची तब्येत स्थिर असल्याचे तिने नमूद केले आहे.

इंस्टाग्रामवर लिहिताना शिल्पा म्हणते, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आवश्यक ती काळजी घेत असून, कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तातडीने चाचणी करून घ्यावी. मास्क वापरा, सुरक्षित राहा.”

शिल्पाने यासोबतच आपल्या चाहत्यांना आणि सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे, मास्कचा वापर करण्याचे आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे. तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावरून तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिल्पा शिरोडकरने ‘बिग बॉस १८’ आणि अनेक हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवलेला आहे. सध्या ती ‘जटाधारा’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे, मात्र आजारामुळे ती काही काळासाठी विश्रांती घेणार असल्याचे संकेत आहेत.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार