मनोरंजन

The Queen Marches to Conquer - दीपिका पदुकोणची अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुनच्या भव्य चित्रपटात दमदार 'एंट्री'

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘AA22xA6’ या चित्रपटात दीपिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन यांच्या या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर आज शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. तर त्याआधी शुक्रवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

नेहा जाधव - तांबे

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘AA22xA6’ या चित्रपटात दीपिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन यांच्या या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर आज शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. तर त्याआधी शुक्रवारी (6 जून) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

टीझरमधून प्रेक्षकांना दीपिका पदुकोणचा पहिलावहिला लूक पाहायला मिळत आहे. ८ सप्टेंबर २०२४ रोजी लेक दुआला जन्म दिल्यानंतर दीपिकाने काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता या भव्यदिव्य प्रोजेक्टमधून ती कमबॅक करत आहे.

शनिवारी निर्मात्यांनी एका खास व्हिडिओच्या माध्यमातून “The Queen marches to conquer! Welcome onboard,” अशा दमदार कॅप्शनसह दीपिकाचे स्वागत केले.

या चित्रपटात दीपिकाची भूमिका महत्त्वाची असणार असून, तिच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. याआधी दीपिकाने संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ या चित्रपटातून बाहेर पडल्याचे वृत्त समोर आले होते.

दीपिका पदुकोणचा अ‍ॅटलीसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी तिने अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात भूमिका साकारली होती, जो अ‍ॅटलीचा पहिला हिंदी चित्रपट ठरला होता. मात्र, अल्लू अर्जुनसोबत दीपिकाचा हा पहिला चित्रपट आहे. तर अल्लू अर्जुनचा अ‍ॅटलीसोबत हा पहिला चित्रपट आहे.

पहिल्याच टीझरमध्ये दीपिकाची झलक दिसली असली तरी अल्लू अर्जुनची झलक अजून समोर आलेली नाही. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या भूमिकेबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीझर पाहता, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video