Photo : Instagram (devoleena)
मनोरंजन

ट्रोलर्सनी ७ महिन्यांच्या बाळाला म्हटले 'काळा'; देवोलीना संतापली; सायबर क्राईमकडे केली तक्रार, "माझ्या बाळाला...

'यापुढे माझ्या मुलावर जे कोणी टीका करतील, त्यांना तुरुंगाची हवा खायला लागेल,' असा इशारा...

Mayuri Gawade

टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर एका गंभीर मुद्द्यावरून चर्चेत आहे. याआधी आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तर, आता तिच्या अवघ्या ७ महिन्यांच्या बाळालाही नेटकऱ्यांनी लक्ष्य केलंय. देवोलीनाने सायबर क्राइम विभागाकडे धाव घेतली आहे. तिने ट्रोलर्स विरोधात तक्रार दाखल केली असून 'यापुढे तिच्या मुलावर जे कोणी टीका करतील, त्यांना तुरुंगाची हवा खायला लागेल,' असा इशारा देखील तिने यावेळी दिला आहे.

अलिकडेच देवोलीनाचा मुलगा 'जॉय' हा ७ महिन्यांचा झाला. त्या निमित्ताने तिने सेलिब्रेशन केले होते. या प्रसंगाचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यातून पहिल्यांदाच तिच्या बाळाचा चेहरा जगासमोर आला. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या, तर काहींनी बाळाच्या रंगावरून त्याला ट्रोल करत, विखारी प्रतिक्रिया दिल्या. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देवोलीनाने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

ट्रोल करणाऱ्यांना सक्त ताकीद

तिने यापुढे तिच्या मुलाला ट्रोल करणाऱ्यांना सक्त ताकीद देत म्हंटलं, की "मी सेलिब्रिटी आहे म्हणून माझ्यावर टीका झाली, तर मी सहन करते. कारण मला माहिती होतं प्रेमासोबत मला द्वेषही मिळेल. म्हणून मी गप्प होते. त्यानंतर मी आंतरधर्मीय विवाह केल्याने माझ्या लग्नावर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले, मी तरीही लक्ष नाही दिलं. पण, माझ्या मुलावर टिका करणं चुकीचं आहे. यावर मी शांत राहणार नाही आणि हे फक्त माझ्या मुलासाठीच नाही, तर अशा वागणुकीविरोधात उभं राहण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे."

तिने ट्रोल्सचे मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स इंस्टाग्रामवर शेअर करत पोलिसांकडे दिले आहेत. सध्या काही ट्रोल्सनी आपले अकाउंट्स डिलीट केल्याचे दिसत असलं, तरी "त्यांना शोधून योग्य ती कारवाई केली जाईल," असंही तिने ठामपणे सांगितलं.

या सगळ्या प्रकारामागे वर्णद्वेष असल्याचा देवोलीनाचा आरोप आहे. "रंगावरून कोणावरही टिप्पणी करणं हा एक गंभीर गुन्हा आहे. अशा लोकांना माफ करून चालणार नाही," असंही ती म्हणाली.

आपल्या मुलासाठी उभं राहणाऱ्या या आईचं धाडस आणि स्पष्टवक्तेपणा सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनलाय.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल