PM
मनोरंजन

"दिल से सोल्जर और दिमाग से शैतान है हम..."; 'बड़े मियां छोटे मियां'चा धमाकेदार टीझर रिलिज

टीझरने प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.

Swapnil S

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफचा 'बड़े मियां छोटे मियां' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर आऊट झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.

काय आहे टीझरमध्ये?-

'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 'ईद'च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्याच व्हॉइस ओव्हरने टीझरची सुरूवात होते. "एक प्रलय...महाप्रलय येणार आहे...जो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलेल....एक प्रलय जो चांगल्या आणि वाईट यांच्यातील युद्ध कायमचे संपवेल... हिंदुस्थानचा नाश होईल...मला कोण अडवणार..?" असे तो म्हणतोय. त्यावर, "दिल से सोल्जर और दिमाग से शैतान है हम" असे टायगर म्हणतोय. तर, "बचके रहना हमसे हिंदुस्थान है हम" असे अक्षय म्हणतोय.

'या' कलाकारांच्या आहेत महत्त्वाच्या भूमिका-

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत आहेत. अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर, याशिवाय सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ (फर्निचरवाला) आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक