PM
PM
मनोरंजन

रीलिजच्या एकदिवस आधी हृतिकच्या ‘फायटर’ला मोठा धक्का; ‘या’ देशांमध्ये चित्रपटावर घातली बंदी

Swapnil S

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'फायटर' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. एवढंच नाहीतर या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावले. उद्या म्हणजेच (२५ जानेवारीला) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर ‘फायटर’च्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.

कोणत्या देशात घातली बंदी ?

एकीकडे भारतीय प्रेक्षकांमध्ये ‘फायटर’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आखाती देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये ‘फायटर’ प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्याप या बंदीमागचे कारण समोर आलेले नाही. चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ आणि निर्माता गिरीश जोहर यांनी ट्वीट करत ही माहिती सर्वांना दिली आहे. आखाती देशात घालण्यात आलेल्या या बंदीमुळे ‘फायटर’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. या बंदीचा चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होणार आहे.

'सीबीएफ'ने चित्रपटांच्या सीन्सवर लावली कात्री -

दरम्यान, सीबीएफ (सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म) ने ‘फायटर’मधील काही डायलॉग आणि सीन्सवर कात्री लावली आहे. सीबीएफच्या सूचनेनुसार, चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. चित्रपटातील काही आक्षेपार्ह शब्द काढून टाकण्यास किंवा त्यांना म्यूट करण्याचे आदेश सीबीएफकडून देण्यात आले आहेत. तसेच चित्रपटातील सेक्युअल सजेस्टेंड विज्युअल्स हटवण्याचीही सूचना करण्यात आली आहे. चित्रपटातील धूम्रपान विरोधातील संदेश हिंदीत दाखवा असेही सांगण्यात आले आहे.

आगाऊ बुकिंगमधून मोठी कमाई-

प्रदर्शनाअगोदरच 'फायटर'ने भारतात आगाऊ बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाची ८६ हजार ५१६ तिकीटांची विक्री झाली असून यातून चित्रपटाने २.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे सर्वाधिक आगाऊ तिकीट बुकिंग महाराष्ट्रात झाले आहे.

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!

Nashik : "छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करतायेत", शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Lok Sabha Elections 2024: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मूसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात? व्हिडिओ व्हायरल

"आदित्य ठाकरेंच्या कपाळावरही लिहिलंय, मेरा बाप...", प्रियांका चतुर्वेदींच्या 'त्या' वक्तव्यावर संजय निरुपम यांचे प्रत्युत्तर

'४ वाजेपर्यंत कामावर या, अन्यथा...' : AI Express ने 'सिक लिव्ह' घेणाऱ्या ३० जणांना काढून टाकले; इतरांना अल्टिमेटम पाठवले