मनोरंजन

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्री ताब्यात

अभिनेत्री सुमन कुमारीकडे बनावट ग्राहक पाठवले. सुमन कुमारीने बनावट ग्राहकाशी करार केला

नवशक्ती Web Desk

मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी छापा टाकून एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी नावाची ही भोजपुरी अभिनेत्री एका हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होती. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आरे कॉलनी भागातील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीकडे बनावट ग्राहक पाठवले. सुमन कुमारीने बनावट ग्राहकाशी करार केला आणि प्रत्येक मॉडेलसाठी 50,000 ते 80,000 रुपयांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या खोलीवर छापा टाकून सुमन कुमारीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी सिनेमात करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या मॉडेल्सची हेरगिरी करायची आणि या मॉडेल्सच्या बळजबरीचा फायदा घेत त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असे. या कारवाईत पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

हुश्श.. आली एकदाची मनपा निवडणूक!

केवळ औपचारिकता, शून्य फलश्रुती

आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी

फक्त ५ मिनिटांत! बाजारातल्या चॉकलेटलाही मागे टाकणारं स्वादिष्ट मिल्क पावडर चॉकलेट बनवा घरच्या घरी